शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळाले; सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधकांचे तोंडावर बोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 04:04 IST

महापालिका सभेत पाण्याऐवजी मराठा आरक्षण अभिनंदन व पाच राज्यांच्या निकालाचे गोडवे

पुणे : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्र्राधिकरणाच्या निकालामुळे पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. परंतु पुणेकरांच्या हिताचा विचार करण्यासाठी निवडून दिलेल्या सदस्यांना याबाबत काही पडले नसून, शुक्रवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहराच्या पाणीकपातीबाबत ब्र शब्ददेखील काढला नाही. सत्ताधाºयांनी मराठा आरक्षण जाहीर केल्याने मुख्यमंत्र्याचा अभिनंदनाचा ठराव मांडून पाण्याच्या प्रश्नाला बगल दिली. तर पाण्याच्या प्रश्नाऐवजी नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या राहुल गांधी यांचे अभिनंदन व कौतुक करण्यातच विरोधकांनी अधिक रस दाखवला. पुण्याच्या पाणीप्रश्नावर आयुक्त सौरभ राव यांनी कोरडे निवेदन करून सभा तहकूब करण्यात आली.पुणे शहराच्या पाणीवापराबाबत गुरुवारी (दि. १३) महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने महापालिकेने दाखल केलेले अपील फेटाळून लावले. यामुळे पुणे शहरात सध्या अस्तित्वात असलेल्या लोकसंख्येच्या आधारे ११५० एमएलडी पाणीपुरवठा मान्य करण्याऐवजी दररोज केवळ निम्माच म्हणजे ६३५ एमएलडीच पाणी देण्याचा निर्णय प्राधिकरणाने दिला. प्राधिकरणाच्या या निर्णयामुळे खरे तर शहरासमोर गंभीर पाणीसंकट उभे राहिले आहे.याबाबत त्वरित तोडगा न काढल्यास येत्या काही दिवसांत पुणेकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागण्याची शक्यता आहे. यामुळे प्राधिकरणाचा निर्णय झाल्यानंतर दुसºयाच दिवशी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोध व सत्ताधाºयांकडून याबाबत साधक-बाधक चर्चा होऊन गंभीर प्रश्न मार्गी लावण्यासाठी काही तरी चर्चा होईल अशी अपेक्षा पुणेकरांना होती. परंतु सभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधकाकडून केवळ नावापुरता पाण्याचा प्रश्न मांडण्यात आला. यावर आयुक्त सौरभ राव यांनीदेखील केवळ वरवरचे निवेदन केले आणि विरोधक गप्प बसले. महापालिकेत प्रचंड बहुमत असलेल्या सत्ताधाºयांना एरवी एखाद्या प्रश्नामध्ये खिंडीत पकडण्याची एकही संधी न सोडणाºया विरोधकांकडून शुक्रवारी पाण्याच्या प्रश्नावर आयुक्तांच्या निवेदनानंतर ब्र शब्द देखील निघाला नाही.दोन दिवसांत अपील दाखल करणारपुणे शहराचा पाण्याचा कोटा ठरविण्यासाठी शहराची सर्व लोकसंख्या, पाण्याची गरज, समाविष्ट गावांतील लोकसंख्या, हद्दीलगतची पाच किलोमीटरपर्यंतची गावे, मोठ्या संस्था व सोसायट्या, कटक मंडळे, तरंगती लोकसंख्या याचा विचार झालेला नाही. पुण्याला प्रतिदिन १३५० एमएलडी पाण्याची गरज आहे. त्यामुळे जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या कलम ३१ ब प्रमाणे पाण्याचा कोटा वाढवून घेण्यासाठी राज्य सरकारकडे दाद मागणार आहोत. यासंदर्भात शहराची लोकसंख्या व पाण्याची निकड लक्षात घेत दोन दिवसांत प्रस्ताव तयार करून राज्य सरकारकडे दाखल केला जाईल, असे स्पष्टीकरण पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी (दि. १४) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केले.पक्षनेत्यांची बैठकदेखील कोरडीचमहाराष्ट्र जलसंपत्ती नियम प्राधिकरणाच्या निर्णयानंतर शहरात गंभीर पाणीप्रश्न निर्माण झाला असून, याबाबत शुक्रवारी पक्षनेत्यांच्या बैठकीत चर्चा करून पुढे काय करायचे याचा निर्णय घेण्यात येईल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले होते.परंतु शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता महापौरांच्या कार्यालयात झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीतदेखील पुण्याच्या पाणीप्रश्नावर एकाही पक्षाच्या गटनेत्यांनी एका शब्दाने देखील महापौरांना विचारले नाही. यामुळे शहरात पाण्याचा प्रश्न पेटला असताना पक्षनेत्यांची बैठकदेखील कोरडीच झाली.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाwater scarcityपाणी टंचाई