शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याचे राजकारण अस्वस्थ

By admin | Updated: September 26, 2014 05:32 IST

गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेशी असलेला घरोबा संपुष्टात आल्याने शहर भाजपमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे

पुणे : गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेशी असलेला घरोबा संपुष्टात आल्याने शहर भाजपमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे महापालिकेत शिवसेनेपेक्षा १0 नगरसेवक जास्त असले, तरी भाजपमध्ये असलेले गटातटाचे राजकारण आणि भाजपच्या तुलनेत शिवसेनेची शहरात असलेली संघटनात्मक बांधणी यामुळे शहरातील आपले तीन बालेकिल्ले वाचविण्याचे आव्हान शहर भाजपपुढे असल्याने भाजपमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.अवघ्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनिल शिरोळे यांना तब्बल २ लाख ९६ हजार मताधिक्य मिळाले. त्यात शिवसेनेचाही मोठा वाटा होता. विशेष म्हणजे शिवसेनेचे आमदार असलेल्या कोथरूड मतदारसंघातून शिरोळे यांना तब्बल १ लाख २२ हजार मते मिळाली होती. त्यामुळे शिवसेनेची ताकद पुन्हा अधोरेखित झाली होती. तसेच मागील विधानसभा निवडणुकीतही नव्याने निर्माण झालेल्या पर्वती मतदारसंघातही शिवसेनेच्या मदतीने भाजपच्या उमेदवार माधुरी मिसाळ विजयी झाल्या होत्या. २0११ मध्ये खडकवासला मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या मदतीने भाजपचे उमेदवार भीमराव तापकीर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. मात्र, निवडणुका अवघ्या तीन आठवड्यांवर येऊन ठेपल्या असताना आता भाजपला सर्व मतदारसंघांची पुनर्बांधणी करावी लागणार आहे. मात्र, युती होणार नाही हे गृहीत धरून सर्व मतदारसंघांतून सक्षम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारी भाजपने यापूर्वीच केली होती. त्यात विद्यमान तीन आमदारांबरोबरच शिवसेनेकडे असलेल्या मतदारसंघात युती असल्याने भाजपकडून विधानसभेनंतर पक्षबांधणी सुरू करण्यात आली होती. त्यामुळे सर्व शक्यता गृहीत धरूनच भाजपने सेनेच्या ताब्यात असलेल्या कोथरूड, कॅन्टोन्मेंट, वडगावशेरी आणि हडपसर मतदारसंघांतून उमेदवारांना तयारी करण्याचे संकेत देण्यात आले होते. त्यानुसार, अनेक इच्छुकांनी तयारीही सुरू केली आहे. त्यामुळे भाजपला या मतदारसंघामध्ये उमेदवारांसाठी फारशी शोधाशोध घ्यावी लागणार नसली, तरी लोकसभेत चाललेला मोदी फॅक्टर विधानसभेत न चालल्यास सेनेच्या उमेदवाराबरोबरच भाजपच्या उमेदवारांची सरळ सरळ लढत होणार आहे. त्यात शिवसेना वरचढ होण्याची शक्यता असल्याने भाजपमध्ये ही अस्वस्थता आहे.(प्रतिनिधी)