पुण्याच्या उपमहापाैरांनी केला राज्यघटनेची प्रत जाळल्याचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 08:48 PM2018-08-13T20:48:52+5:302018-08-13T20:51:29+5:30

दिल्लीच्या घटनेचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निषेध करण्यात अाला.

punes deputy mayour protest against delhi insident | पुण्याच्या उपमहापाैरांनी केला राज्यघटनेची प्रत जाळल्याचा निषेध

पुण्याच्या उपमहापाैरांनी केला राज्यघटनेची प्रत जाळल्याचा निषेध

Next

पुणे : पुण्याचे उपमहापाैर सिद्धार्थ धेंडे यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दिल्लीत संविधानाची प्रत जाळल्याचा निषेध जिल्हाधिकार्यालयाजवळ करण्यात अाला. तसेच राज्यघटनेची प्रत जाळणाऱ्यांच्या विराेधात देशद्राेहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. 

    दिल्लीतील घटनेचा ठिकठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येत अाहे. अाज रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पुण्यातील जिल्हाधिकार्यालयाजवळ या घटनेचा निषेध करण्यात अाला. यावेळी शेकडाे कार्यकर्ते उपस्थित हाेते. मनस्मृतीच्या पाेस्टरचेही यावेळी दहन करण्यात अाले. पुण्याचे उपमहापाैर सिद्धार्थ धेंडे यांच्या साेबतच रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कांबळे ,मातंग आघाडी प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे , परशुराम वाडेकर,बाळासाहेब जानराव,बसवराज गायकवाड,नरेश बनसोडे,विनोद टोपे,वसंत बनसोडे,शशिकला वाघमारे ,प्रियदर्शनी निकाळजे ,मंदार जोशी अादी उपस्थित होते. 

    सिद्धार्थ धेंडे म्हणाले, देशाला एकसंध ठेवणारी राज्यघटना डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांनी देशाला अर्पण केली अाहे. अापली राज्यघटना सर्वांना मूलभूत मानवी हक्क देते. या राज्यघटनेचा अपमान काेणी करत असेल तर ते कदापी सहन केले जाणार नाही. माेदी राज्यघटना हा सर्वाेच्च ग्रंथ असल्याचे म्हणतात परंतु ज्या दिवशी संसदेत एसी एसटी कायदा कठाेर करण्यात येत हाेता त्याच दिवशी बाहेर राज्यघटनेची प्रत जाळण्यात अाली. दाेषींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत देशद्राेहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी अामची मागणी अाहे. 

Web Title: punes deputy mayour protest against delhi insident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.