शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
4
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
5
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
6
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
7
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
8
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
9
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
10
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
11
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
12
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
13
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
14
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
15
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
16
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
17
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
18
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
19
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
20
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला

पुणेकरांनो, अशीच साथ द्या! 'नक्कीच आपण कोरोनाला हरवू'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 13:46 IST

विकेंड लॉकडाऊनला पुणेकरांचा प्रतिसाद

ठळक मुद्देआम्हाला कारवाई करण्याची वेळच आणून देऊ नये

पुणे: राज्यासहित पुण्यातही कोरोनाची चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे एप्रिलच्या सुरुवातीपासून विकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली . सुरुवातीला त्या दोन दिवसात पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कारवाई केली होती. पण आजच्या विकेंड लॉकडाऊनला पुणेकरांनी प्रतिसाद दिल्याचे चित्र शहरात सर्वत्र दिसून आले. त्या पार्श्वभूमीवर लोकमतने प्रमुख चौकातील पोलिसांशी संवाद साधला. त्यावेळी पुणेकरांनी अशीच साथ दिली, तर आपण सगळे मिळून कोरोनाला नकीच हरवू. असे सांगून सर्वानी नियमांचे आजच्या प्रमाणेच पालन करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

नागरिक फक्त सकाळच्या वेळेतच जॉगिंगसाठी बाहेर येत आहेत. त्यांनी या काळात तरी घरात बसावे. आम्हाला कारवाई करण्याची वेळच आणून देऊ नये. असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

पुण्यात मागील आठवड्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली होती. एका दिवसात तब्ब्ल ६,७ हजार रुग्ण आढळून येत होते. त्याच तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही कमी होते. पण गेल्या चार, पाच दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णसंख्येत थोडयाफार प्रमाणात घट होत आहे. त्याचबरोबर कोरोनामुक्तीचे प्रमाणही वाढत चालले आहे. २३ एप्रिलला ४ हजार ४६५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. तर ५ हजार ६३४ रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. काल दिवसभरात ३ हजार ९९१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. तर ४ हजार ७८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. त्यामुळे पुणेकरांनी अशाच प्रकारे नियमांचे पालन करावे असे पोलीस सांगत आहेत.

"सद्यस्थितीत प्रशासन यंत्रणा युद्धपातळीवर कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. आम्हाला पूर्वी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी लागत होती. आता विनाकारण बाहेर पडणाऱ्या लोकांची विचारपूस करावी लागत आहे. आज मात्र रस्त्यावर नागरिक दिसून आले नाहीत. याचप्रमाणे दररोज नियमांचे पालन ते करतील". अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.  

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPoliceपोलिस