शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

महापालिकेचा मिळकर कर ऑनलाईन भरण्याला पुणेकरांची पसंती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 19:20 IST

महापालिकेने मिळकत भरण्यासाठी ऑनलाईन सुविधेला पुणेकर प्राधान्य देत असून मिळकतकरापैकी ३४.९६ टक्के रक्कम ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात आली आहे.

ठळक मुद्देक्रेडीट कार्ड ९२ हजार ९५१ आणि डेबीट कार्डच्या माध्यमातून ८३ हजार ९२७ कर जमापालिकेचे उत्पन्न वाढावे, कर वेळेत भरला जावा यासाठी प्रयत्न सुरु ज्यांनी मिळकत कराची थकबाकी ठेवलेली आहे अशा तब्बल  ७०० मिळकती सील

पुणे : महापालिकेने मिळकत भरण्यासाठी ऑनलाईन सुविधेला पुणेकर प्राधान्य देत असून मिळकतकरापैकी ३४.९६ टक्के रक्कम ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात आली आहे. घरबसल्या कर भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने एकूण करदात्यांपैकी ४५.८७ टक्के करदात्यांनी ऑनलाईन पद्धतीचा वापर केला आहे. नेट बँकींगद्वारे १ लाख ४६ हजार २२० नागरिकांनी कर भरला आहे. तर क्रेडीट कार्डच्या माध्यमातून ९२ हजार ९५१ आणि डेबीट कार्डच्या माध्यमातून ८३ हजार ९२७ करदात्यांनी कर जमा केला आहे. पालिकेचे उत्पन्न वाढावे, थकित मिळकतकर भरला जावा, तसेच हा कर वेळेत भरला जावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. नागरिकांचा कर भरण्याकडे कल वाढावा याकरिता करामध्ये सवलत देण्यासोबतच दंडात्मक कारवाईचा बडगाही उगारण्यात येत आहे. मात्र, ऑनलाईन पद्धतीने कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याने त्याचा फायदा झाल्याचे दिसून येत आहे. ऑनलाईन कर स्विकारण्यासाठी भारत क्युआर कार्ड, कॅश कार्ड, क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, ईबीपीपी, मोबाईल वॉलेट, एनईएफटी आरटीजीएस, नेट बँकींग, पोस्ट क्रेडीट कार्ड, पोस्ट डेबीट कार्ड, युपीआय, गुगल पे, फोन पे आदी प्रणालींचा अवलंब केला आहे. आजमितीस जमा झालेल्या १ हजार ९५ कोटी मिळकतकरापैकी ३८१ कोटी ५८ लाख ६० हजार ३८६ रुपये ऑनलाईन पद्धतीने पालिकेकडे जमा झाले आहेत. तर मिळकतकर भरलेल्या एकूण करदात्यांपैकी ४५.८७ टक्के करदात्यांनी ऑनलाईन पद्धतीचा वापर केला आहे. ज्यांनी मिळकत कराची थकबाकी ठेवलेली आहे अशा तब्बल  ७०० मिळकती सील करण्यात आल्या आहेत. थकबाकी दारांच्या घरांसमोर बँड वाजविणे, नोटीसा देणे, नावाची जाहिर करणे, मिळकती सील करणे, मिळकतीचा लिलाव करणे अशी कारवाई सुरु आहे. येत्या १५ दिवसात १०० ते १५० कोटींचा मिळकतकर पालिकेच्या तिजोरीत जमा होईल अशी आशा कर आकारणी आणि करसंकलन विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाonlineऑनलाइनdigitalडिजिटलTaxकर