Pune ZP Election Result 2026 : भोर पंचायत समितीच्या सत्तेची सूत्रे चिठ्ठीवर ठरणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 19:43 IST2026-02-10T19:43:06+5:302026-02-10T19:43:58+5:30
भोर पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव ठरवण्यात आले आहे.

Pune ZP Election Result 2026 : भोर पंचायत समितीच्या सत्तेची सूत्रे चिठ्ठीवर ठरणार?
भोर : भोर पंचायत समितीच्या झालेल्या निवडणुकीत आठ ठिकाणांपैकी चार स्थानिक जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने जिंकल्या तर चार जागा भारतीय जनता पार्टीने आपल्या खात्यावर केल्या आहेत. बहुमतासाठी आवश्यक पाच जागा कोणत्याही पक्षाला मिळाल्या नसल्यामुळे पंचायत समितीचा सभापती चिटिंगवर होणार का? कोणता चमत्कार घडणार या गोष्टीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
भोर पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव ठरवण्यात आले आहे. या पदासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे उत्रोली व कारी गणांमधून निवडून आलेल्या सुषमा विक्रम चव्हाण व माजी जिल्हा परिषद सदस्य गीता आनंद आंबवले, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून कामथडी गणातून विजयी झालेल्या माजी जिल्हा परिषद सदस्य तृप्ती विक्रम खुटवड व शिंदे गणातून विजयी झालेल्या मनीषा संतोष कंक प्रमुख दावेदार आहेत. मात्र, दोन्ही पक्षांना समान जागा मिळाल्यामुळे मोठे पेज निर्माण झाले आहे.
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये चार गटांपैकी भारतीय जनता पार्टीने वेळू नसरापूर गट आणि उत्रोली-कारी गट जिंकले आहेत, तर कामथडी भोंगवली व भोलावडे-शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जिंकले आहेत. पंचायत समितीच्या आठ गणांपैकी चार जागा भाजपला तर चार जागा राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत. शिंदेसेनेसह इतर कोणत्याही पक्षाला जागा मिळाल्या नसल्यामुळे बहुमतासाठी आवश्यक असलेल्या पाच जागांचा आकडा कोणत्याही पक्षाने गाठला नाही. त्यामुळे भोर पंचायत समितीचे सभापती चिटिंगवर होणार का किंवा कोणता चमत्कार घडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कान्होजी जेधे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास खरात यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार राजेंद्र नजन, नायब तहसीलदार अरुण कदम, वैशाली घोरपडे यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली.
जिल्हा परिषद गटातील उमेदवारांना मिळालेली मते : वेळू नसरापूर गटात पोपट सुके (भाजप) विजयी (८५९४), गणेश खुटवड (राष्ट्रवादी अजित पवार) (४३३२), अमोल पांगारे (शिंदेसेना) (५५०५), अनिकेत शिंदे (उद्धवसेना) (७८७८), जीवन कोंडे (अपक्ष) (१५५६).
वेळू गणात ज्ञानेश्वर पांगारे (भाजप) (४००२) विजयी, महेंद्र भोरडे (उद्धवसेना) (३०६८), अशोक वाडकर (राष्ट्रवादी अजित पवार गट) (२०४५), स्वप्नील शिंदे (२३४५).
नसरापूर गणात विशाल कोंडे (राष्ट्रवादी अजित पवार) (५०७७) विजयी, प्रवीण धावले (शिंदेसेना) (२४५५), सचिन बांदल (उद्धवसेना) (२८९८), अमोल शिळीमकर (भाजप) (३८२२).
कामथडी भोंगवली गटात विक्रम खुटवड (राष्ट्रवादी अजित पवार) (११५०२) विजयी, चंद्रकांत बाठे (अपक्ष) (९७०८), महादेव सोनवणे (शिंदेसेना) (२१५०), महेश टापरे (भाजप) (७१९८).
भोंगवली गणात रोहन बाठे (भाजप) (५३९०) विजयी, गणेश निगडे (राष्ट्रवादी अजित पवार) (३९९७), अक्षय सोनवणे (अपक्ष) (४८९२), विकास चव्हाण (शिंदेसेना) (१२५७).
कामथडी गणात तृप्ती खुटवड (राष्ट्रवादी अजित पवार) (६९६५) विजयी, नीता इंगुळकर (भाजप) (५१६९), क्रांती धुमाळ (शिंदेसेना) (२४७१).
शिंद-भोलावडे गटात प्रवीण जगदाळे (राष्ट्रवादी अजित पवार) (१२१८२) विजयी, विठ्ठल आवळे (भाजप) (११६८६), प्रमोद भालेराव (२७५).
भोलावडे गणात राजेश बोडके (राष्ट्रवादी अजित पवार) (५५७८) विजयी, काळूराम मळेकर (भाजप) (५२८४), अक्षय चव्हाण (शिंदेसेना) (१२७९).
शिंद-गणात मनीषा कंक (राष्ट्रवादी अजित पवार) (६९१८) विजयी, मनीषा पार्टी (भाजप) (४३७८), वैशाली साळुंखे (उद्धवसेना) (११४१).
उत्रोली-कारी गटात स्वरूपा थोपटे (भाजप) (१८९६७) विजयी, रणजित शिवतरे (राष्ट्रवादी अजित पवार) (१३३२४), उत्रोली गणात सुषमा चव्हाण (भाजप) (१०३२४) विजयी, सुनीता वरे (राष्ट्रवादी अजित पवार) (६५०२), कारी गणात गीता आंबवले (भाजप) (९१६७) विजयी, सारिका कोंढाळकर (राष्ट्रवादी अजित पवार) (६९०८).