Pune ZP Election Result 2026: प्रतीक्षा निकालाची..! कुरुळी-आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद व गणात प्रचंड चुरस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 10:38 IST2026-02-09T10:38:09+5:302026-02-09T10:38:18+5:30

प्रचाराच्या धामधुमीनंतर आता सर्वांचे लक्ष थेट निकालाकडे लागले आहे.

Pune ZP Election Result 2026 Waiting for the results..! Huge competition in Kuruli-Alandi Rural Zilla Parishad and Gana | Pune ZP Election Result 2026: प्रतीक्षा निकालाची..! कुरुळी-आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद व गणात प्रचंड चुरस 

Pune ZP Election Result 2026: प्रतीक्षा निकालाची..! कुरुळी-आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद व गणात प्रचंड चुरस 

कुरुळी : आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात यंदाच्या निवडणुकीत प्रचंड चुरस पाहायला मिळत असून सर्वच प्रमुख पक्षांनी ताकदीचे उमेदवार मैदानात उतरवले असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. प्रचाराच्या धामधुमीनंतर आता सर्वांचे लक्ष थेट निकालाकडे लागले आहे.

कुरुळी-आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी (अजित पवार)च्या शितल आशिष येळवंडे, उद्धव सेनेच्या विनया सुधीर मुंगसे तसेच भाजपच्या कल्पना पाटीलबुवा गवारी यांच्यात प्रामुख्याने तिरंगी लढत रंगली होती. तिन्ही उमेदवारांनी गावोगावी संपर्क साधत जोरदार प्रचार केल्याने मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, कुरुळी पंचायत समिती गणातही तितकीच अटीतटीची लढत पाहायला मिळाली. या गणात राष्ट्रवादी (अजित पवार)च्या सुरेखा राहुल गवारी, शिंदे सेनेच्या तनुजा नीलेश पवार आणि उद्धवसेनेच्या गौरी चंदन मुऱ्हे यांच्यात तिरंगी सामना झाला.

प्रत्येक उमेदवाराला आपापल्या पक्षाचा मजबूत पाठिंबा असल्याने निकाल कोणाच्या बाजूने लागणार, याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. आळंदी ग्रामीण पंचायत समिती गणात मात्र थेट सामना रंगला आहे. येथे उद्धव सेनेचे काळुराम थोरवे आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांचे निखिल थोरवे यांच्यात थेट लढत असल्याचे चित्र आहे. दोन्ही उमेदवारांची स्थानिक पातळीवर मजबूत पकड असल्याने हा सामना अत्यंत हाय व्होल्टेज ठरला आहे. एकूणच कुरुळी-आळंदी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट-गणांमध्ये कोण बाजी मारणार, कोणाचा गड अबाधित राहणार आणि कोणाला पराभवाचा सामना करावा लागणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून आता सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत.

Web Title : पुणे ZP चुनाव 2026: कांटे की टक्कर, नतीजों पर सबकी निगाहें!

Web Summary : कुरुली-आळंदी में ZP और पंचायत समिति चुनाव में कड़ी टक्कर है। NCP, शिवसेना (UBT), और BJP के प्रमुख उम्मीदवार प्रतिस्पर्धा कर रहे हैं। आलंदी में सीधा मुकाबला है, जिससे नतीजों का इंतजार बढ़ गया है।

Web Title : Pune ZP Election 2026: Intense fight, all eyes on results!

Web Summary : Kuruli-Alandi witnesses a fierce ZP and Panchayat Samiti election. Key candidates from NCP, Shiv Sena (UBT), and BJP compete. A direct fight is seen in Alandi, increasing anticipation for the results.