Pune ZP Election Result 2026 :'माझ्यावर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या..' पराभवानंतर निर्मला नवलेंची पोस्ट पुन्हा चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 15:19 IST2026-02-10T15:05:47+5:302026-02-10T15:19:42+5:30

- ही लढाई इथे थांबणार नाही पराभवानंतर निर्मला नवले यांची भावनिक पोस्ट चर्चेत

Pune ZP Election Result 2026: 'Those who love me selflessly..' Nirmala Navale's social media post is in the news again after the defeat | Pune ZP Election Result 2026 :'माझ्यावर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या..' पराभवानंतर निर्मला नवलेंची पोस्ट पुन्हा चर्चेत

Pune ZP Election Result 2026 :'माझ्यावर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या..' पराभवानंतर निर्मला नवलेंची पोस्ट पुन्हा चर्चेत

पुणे - शिरूर तालुक्यातील कारेगावच्या माजी सरपंच आणि सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या निर्मला नवले यांना पंचायत समिती निवडणुकीत अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या नवले यांना माजी पंचायत समिती सदस्या मनीषा पाचंगे यांनी ३३५ मतांच्या फरकाने पराभूत केले.

सोशल मीडियावरील आक्रमक शैली आणि मोठा फॉलोअर्स वर्ग यामुळे नवले यांच्या विजयाची चर्चा आधीपासूनच रंगली होती. मात्र, प्रत्यक्ष मतदानात मतदारांनी पाचंगे यांना पसंती दिल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.




निर्मला नवले या केवळ शिरूरपुरत्या मर्यादित नसून त्यांच्या व्हिडिओंमुळे राज्यभर ओळख निर्माण झाली आहे. सुमारे पाच लाख फॉलोअर्सचा पाठिंबा असतानाही निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही, पराभवानंतर नवले यांनी इंस्टाग्रामवर भावनिक प्रतिक्रिया देत आपल्या समर्थकांचे आभार मानले. “माझ्यावर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या आणि निवडणुकीत साथ देणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्यांची मी ऋणी आहे. तुमच्या पाठिंब्यामुळे नव्या जिद्दीने पुढे जाण्याची ताकद मिळाली आहे. ही लढाई इथे थांबणार नाही,” असा संदेश त्यांनी पोस्टमध्ये दिला. त्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर समर्थकांकडून  प्रतिक्रिया येत आहे.

Web Title : पुणे जेडपी चुनाव: अप्रत्याशित हार के बाद निर्मला नवले की सोशल मीडिया पोस्ट

Web Summary : पूर्व सरपंच निर्मला नवले को पंचायत समिति चुनाव में हार का सामना करना पड़ा। सोशल मीडिया पर बड़ी संख्या में फॉलोअर्स होने के बावजूद उन्हें निराशा मिली। उन्होंने इंस्टाग्राम पर समर्थकों का आभार व्यक्त किया और संघर्ष जारी रखने का वादा किया। मनीषा पाचंगे ने नवले को 335 वोटों से हराया।

Web Title : Pune ZP Election: Nirmala Navale's Social Media Post After Unexpected Defeat

Web Summary : Nirmala Navale, former Sarpanch, faced defeat in the Panchayat Samiti election despite her large social media following. She thanked supporters in an emotional Instagram post, vowing to continue the fight. Manisha Pachange defeated Navale by 335 votes, surprising many.