Pune ZP Election Result 2026 : मशाल पेटली..! जुन्नर तालुक्यात शिवसेनेचे गुलाब पारखे विजयी आशाताई बुचके यांचा धक्कादायक पराभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 12:40 IST2026-02-09T12:40:03+5:302026-02-09T12:40:54+5:30
- जुन्नर तालुक्यात राजकीय उलथापालथ; सावरगावमध्ये आशाताई बुचके यांचा धक्कादायक पराभव, शिवसेनेचे गुलाब पारखे विजयी

Pune ZP Election Result 2026 : मशाल पेटली..! जुन्नर तालुक्यात शिवसेनेचे गुलाब पारखे विजयी आशाताई बुचके यांचा धक्कादायक पराभव
पुणे - जुन्नर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये यंदा अनेक गटांमध्ये अनपेक्षित निकाल लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. विशेषतः सावरगाव गटामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके यांचा झालेला धक्कादायक पराभव हा दिवसाचा सर्वात मोठा राजकीय ट्विस्ट ठरला. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे उमेदवार गुलाब पारखे यांनी सुमारे 1000 मतांच्या आघाडीने विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली.
मतमोजणीच्या सहाव्या फेरीअखेर चित्र स्पष्ट होत गेले आणि अनेक गटांमध्ये महायुती व महाविकास आघाडीतील उमेदवारांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. ग्रामीण भागातील मतदारांनी विकासाच्या मुद्द्यांवर मतदान केल्याचे चित्र दिसून आले.
गटनिहाय निकाल (६ वी फेरी अखेर)
डिंगोरे-उदापूर गट: सोनाबाई दाभाडे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 500 मतांनी आघाडी
ओतूर-धालेवाडी गट: छाया तांबे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 1400 मतांनी विजयाच्या दिशेने
आळे-पिंपळवंडी गट: मंगेश काकडे (शिवसेना शिंदे) – तब्बल 4100 मतांची आघाडी
बेल्हे-राजुरी गट: स्मिता कणसे (शिवसेना शिंदे) – 2661 मतांनी पुढे
बोरी-खोडद गट: कल्पना काळे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 1600 मतांची आघाडी
नारायणगाव-वारूळवाडी गट: नेहा पाटे (शिवसेना शिंदे) – सुमारे 5500 मतांनी मोठी आघाडी
सावरगाव-कुसुर गट: गुलाब पारखे (शिवसेना उद्धव ठाकरे) – 1000 मतांनी विजय
बारव-तांबे गट: मोनाली लांडे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 1200 मतांनी आघाडी
या निकालांमधून जुन्नर तालुक्यात शिवसेनेच्या दोन्ही गटांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट सामना झाल्याचे दिसून येते. काही ठिकाणी शिवसेना शिंदे गटाने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला, तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपले बालेकिल्ले कायम राखले. सावरगावमधील निकालामुळे स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ग्रामीण मतदारांचा वाढता सहभाग आणि स्थानिक प्रश्नांवर आधारित मतदानामुळे आगामी निवडणुकांसाठी हा कल महत्त्वाचा मानला जात आहे.