Pune ZP Election Result 2026: जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी आघाडीवर; ठाकरे सेनेचे खाते उघडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 11:16 IST2026-02-09T11:16:12+5:302026-02-09T11:16:55+5:30

पुणे जिल्ह्यात ठाकरे गटाच्या शिवसेनेने अखेर खाते उघडले आहे

Pune ZP Election Result 2026 Thackeray Sena opens account in Pune district; Congress remains at zero | Pune ZP Election Result 2026: जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी आघाडीवर; ठाकरे सेनेचे खाते उघडले

Pune ZP Election Result 2026: जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी आघाडीवर; ठाकरे सेनेचे खाते उघडले

 पुणे : पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांसाठी शनिवारी (दि. ७) पार पडलेल्या निवडणुकांमध्ये ६८.३५ टक्के मतदान झाले होते. आज सोमवारी (दि. ९) सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून जिल्ह्याच्या राजकीय नेतृत्वाचा फैसला होत आहे.

मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांत समोर आलेल्या आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यात ठाकरे गटाच्या शिवसेनेने अखेर खाते उघडले आहे, तर काँग्रेसला मात्र एकही जागा मिळालेली नाही. यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेससमोर आपला पारंपरिक बालेकिल्ला टिकवण्याचे आव्हान होते. आतापर्यंतच्या कलांनुसार राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर असून भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे.

आतापर्यंतची पक्षनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे –

भाजप: ६

शिवसेना (शिंदे गट): ३

राष्ट्रवादी काँग्रेस: १०

काँग्रेस: ०

ठाकरे गट शिवसेना: १

राष्ट्रवादी (शरद पवार गट): १

इतर: ०

मतमोजणी अद्याप सुरू असून अंतिम निकालानंतर पुणे जिल्ह्यात सत्तेचा ताबा कोणाच्या हाती जाणार, याबाबत स्पष्ट चित्र समोर येणार आहे. या निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

 

Web Title : पुणे ZP चुनाव में NCP आगे; ठाकरे सेना का खाता खुला।

Web Summary : पुणे जिला परिषद चुनाव में NCP सबसे आगे, BJP दूसरे स्थान पर। ठाकरे सेना को मिली सीट, कांग्रेस का खाता नहीं खुला। सबकी निगाहें अंतिम नतीजों पर।

Web Title : NCP Leads Pune ZP Election; Thackeray Sena Opens Account.

Web Summary : Pune ZP election sees NCP leading, BJP second. Thackeray Sena gains a seat, while Congress draws blank. All eyes on final results.