Pune ZP Election Result 2026: भिगवण मतमोजणीत तणाव; तीन तासांत एकही निकाल नाही, पोलिसांचा हस्तक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 13:14 IST2026-02-09T13:14:01+5:302026-02-09T13:14:18+5:30

- भिगवण येथे मतमोजणी सुरू होऊन तब्बल तीन तास उलटून गेले तरी एकही अधिकृत निकाल जाहीर न झाल्याने उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली.

Pune ZP Election Result 2026 Tension in Bhigwan vote counting; No results in three hours, police intervention | Pune ZP Election Result 2026: भिगवण मतमोजणीत तणाव; तीन तासांत एकही निकाल नाही, पोलिसांचा हस्तक्षेप

Pune ZP Election Result 2026: भिगवण मतमोजणीत तणाव; तीन तासांत एकही निकाल नाही, पोलिसांचा हस्तक्षेप

पुणे :पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांसाठी शनिवारी (दि. ७) पार पडलेल्या निवडणुकांमध्ये ६८.३५ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकांच्या निकालासाठी आज सोमवारी (दि. ९) सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील राजकीय चित्र स्पष्ट होण्यास सुरुवात झाली आहे.

मतमोजणीच्या प्रारंभीच्या फेऱ्यांमध्ये पुणे जिल्ह्यात ठाकरे गटाच्या शिवसेनेने खाते उघडल्याचे चित्र समोर आले आहे. मात्र काँग्रेसला अद्याप एकही जागा मिळालेली नसल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, भिगवण येथे मतमोजणी सुरू होऊन तब्बल तीन तास उलटून गेले तरी एकही अधिकृत निकाल जाहीर न झाल्याने उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. भिगवण गटाची मतमोजणी पूर्ण झाली असली तरी शेटफळ गढे गणातील मतमोजणीबाबत उमेदवारांच्या प्रतिनिधींनी आक्षेप नोंदवले.

यामुळे मतमोजणी केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. प्रतिनिधी आणि उपस्थित नागरिक केंद्रावरून हटण्यास तयार नसल्याने किरकोळ वाद झाला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. यावेळी मतदान केंद्राबाहेर पोलिस आणि नागरिकांमध्ये वादावादी झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत असून उर्वरित निकालांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Web Title : पुणे जेडपी चुनाव: भिगवण मतगणना में तनाव, कोई परिणाम नहीं, पुलिस हस्तक्षेप

Web Summary : पुणे जेडपी चुनाव की भिगवण मतगणना में तनाव देखा गया क्योंकि तीन घंटे बाद भी कोई परिणाम घोषित नहीं हुआ, जिसके कारण मतगणना पर विवाद के चलते पुलिस को हस्तक्षेप करना पड़ा। शिवसेना (ठाकरे) को शुरुआती बढ़त मिली, लेकिन अशांति फैल गई, जिससे आधिकारिक परिणामों की घोषणा में देरी हुई और तनावपूर्ण माहौल बन गया। सबकी निगाहें बचे हुए परिणामों पर हैं।

Web Title : Pune ZP Election: Bhigwan Counting Tense, No Results, Police Intervene

Web Summary : Pune ZP election counting in Bhigwan faced tension as no results were declared after three hours, prompting police intervention due to disputes over vote counting. While Shiv Sena (Thackeray) gained initial leads, unrest arose, delaying the announcement of official results and creating a tense atmosphere. All eyes are on remaining results.