पुणे : जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांसाठी मतमोजणी सुरु आहे. जिल्ह्याचे राजकीय कारभारी कोण असतील, याचा आजच फैसला होणार आहे. मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर जुने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आपला गड राखणार की विरोधक सत्तांतर घडवणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या मतमोजणीला सकाळी दहापासून सुरुवात होणार आहे. यासाठी जिल्ह्यात १३ ठिकाणी स्वतंत्र मतमोजणी केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, आवश्यक ती सर्व तयारीची पूर्तता करण्यात आली आहे. वेल्हे येथे सर्वांत कमी तर जुन्नर तालुक्यात सर्वाधिक ४० टेबलांवर मतमोजणी होणार आहे.
राजगड तालुक्यात एका जागेवर भाजप आहे. तर इतर सर्व जागांवर अजितदादांच्या राष्ट्रवादीने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. शिंदेसेना, ठाकरे सेना आणि काँग्रेसला काहीच जागा मिळाल्या नाहीत. या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी २९९ उमेदवार, तर पंचायत समित्यांच्या १४६ गणांसाठी ५२८ उमेदवार रिंगणात होते. गेल्या वेळेच्या तुलनेत यावेळी मतदानात सुमारे दीड टक्का घट झाली. गेल्या वेळी ७०.३५ टक्के मतदान झाले होते. शनिवारी झालेल्या मतदानानंतर या सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. दरम्यान, मतमोजणी सोमवारी (दि. ९) होणार आहे. सर्वाधिक मतदान राजगड तालुक्यात ७९.३० टक्के, तर सर्वात कमी बारामती तालुक्यात ५४.९० टक्के झाले.
राजगड तालुका निकाल
वेल्हे - जिल्हा परिषद गट
1) तानाजी दगडू मांगडे राष्ट्रवादी काँग्रेसवेल्हे गण - सीता नंदकुमार खुळे ( विजयी) राष्ट्रवादी काँग्रेस वांगणी गण - संदीप लहू खुटवड (विजयी) राष्ट्रवादी काँग्रेस
विंझर गट - जिल्हा परिषद
1) अमोल उल्हास नलावडे राष्ट्रवादी काँग्रेसविंझर गण - गणेश नामदेव जागडे (विजयी) भाजपा 2) पानशेत गण - सुवर्णा किरण राऊत (विजयी) राष्ट्रवादी काँग्रेस
तालुकानिहाय मतदानाची आकडेवारी (अंदाजे)
जुन्नर – ६१.१८आंबेगाव – ६५.३०शिरूर – ७५.५९खेड – ७५.४६मावळ – ७७.४३मुळशी – ६३.७९हवेली – ६८.०२दौंड – ६५.००पुरंदर – ६८.३७राजगड (वेल्हा) – ७९.३०भोर – ७५.६२बारामती – ५४.९०इंदापूर – ६५.६७
Web Summary : In Pune's Rajgad, NCP dominates ZP election; BJP secures one seat. Allies face setbacks. Highest voting in Rajgad, lowest in Baramati. Counting underway.
Web Summary : पुणे के राजगढ़ में, NCP का ZP चुनाव में दबदबा; BJP को मिली एक सीट। सहयोगियों को झटका लगा। राजगढ़ में सबसे ज्यादा, बारामती में सबसे कम मतदान। गिनती जारी है।