Pune ZP Election Result 2026 : भिगवण-शेटफळगढे गटात राष्ट्रवादीचा विजय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 13:26 IST2026-02-09T13:25:16+5:302026-02-09T13:26:36+5:30

भिगवण-शेटफळगढे गटातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उल्लेखनीय यश मिळवत आपला प्रभाव पुन्हा सिद्ध केला आहे.

Pune ZP Election Result 2026: NCP wins in Bhigwan-Shetfalgade constituency | Pune ZP Election Result 2026 : भिगवण-शेटफळगढे गटात राष्ट्रवादीचा विजय 

Pune ZP Election Result 2026 : भिगवण-शेटफळगढे गटात राष्ट्रवादीचा विजय 

भिगवण : भिगवण-शेटफळगढे गटातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उल्लेखनीय यश मिळवत आपला प्रभाव पुन्हा सिद्ध केला आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या वातावरणाचा थेट फायदा राष्ट्रवादीच्या उमेदवारांना झाल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे.

भिगवण-शेटफळगढे गटातून राष्ट्रवादीच्या मेघना तुकाराम बंडगर यांनी तब्बल १५,१४६ मतांनी विजय मिळवला. त्याचप्रमाणे गणातून हेमा पद्माकर माडगे यांनी ९,५११ मतांनी, तर शेटफळगढे गणातून जितेंद्र प्रल्हाद वणवे यांनी १,३६२ मतांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.

तिरंगी लढतीत राष्ट्रवादी वरचढ
या निवडणुकीत तिरंगी लढत रंगली होती. अपक्ष उमेदवार सोनाली बंडगर दुसऱ्या स्थानी राहिल्या, तर भाजपाच्या कोमल बंडगर यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी हर्षवर्धन पाटील आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एकत्र येत राष्ट्रवादीच्या गटबांधणीला बळ दिले. दोन्ही गटांनी एकत्र लढल्याचा सकारात्मक परिणाम इंदापूर तालुक्यात स्पष्टपणे दिसून आला.

शांत प्रचार, पण प्रभावी रणनीती
अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादीने मोठ्या जाहीर सभा टाळत संयमित प्रचारावर भर दिला. स्थानिक विकासकामे आणि दिवंगत नेत्यांनी केलेल्या प्रकल्पांची आठवण मतदारांना करून देत शेवटच्या टप्प्यात भावनिक साद घालण्यात आली. ही रणनीती निर्णायक ठरल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

विकासकामे आणि भावनिक लाट यांची सांगड
भिगवण-शेटफळगढे परिसरात झालेला विकास आणि नेतृत्वावरील विश्वास यासोबत सहानुभूतीची लाट एकत्र आल्याने राष्ट्रवादीला मोठा फायदा झाला. आगामी स्थानिक राजकारणात या निकालाचे दूरगामी परिणाम दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title : पुणे ZP चुनाव 2026: भिगवन-शेटफळगढे समूह में NCP की जीत

Web Summary : पुणे ZP चुनाव में, अजित पवार के निधन के बाद सहानुभूति की लहर में NCP ने भिगवन-शेटफळगढे समूह में जीत हासिल की। मेघना बंडगर ने बड़ी जीत दर्ज की। गठबंधन और स्थानीय विकास कार्यों पर जोर देने से NCP का दबदबा कायम हुआ। भविष्य में राजनीतिक प्रभाव की उम्मीद है।

Web Title : NCP triumphs in Bhigvan-Shetfalgadhe group at Pune ZP Election 2026

Web Summary : Nationalist Congress Party (NCP) secured victory in Bhigvan-Shetfalgadhe, Pune ZP election, fueled by sympathy after Ajit Pawar's death. Meghana Bandgar won by a significant margin. The victory showcases NCP's dominance, aided by strategic alliances and emphasizing local development projects. Future political impact is anticipated.