Pune ZP Election Result 2026 :जुन्नर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा झेंडा, पंचायत समितीत शिंदे गट मजबूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 16:42 IST2026-02-09T16:32:56+5:302026-02-09T16:42:49+5:30

जुन्नर तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनी स्थानिक राजकारणाला नवे वळण दिले आहे.

Pune ZP Election Result 2026 NCP flag in Junnar Zilla Parishad, Shinde faction strong in Panchayat Samiti | Pune ZP Election Result 2026 :जुन्नर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा झेंडा, पंचायत समितीत शिंदे गट मजबूत

Pune ZP Election Result 2026 :जुन्नर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा झेंडा, पंचायत समितीत शिंदे गट मजबूत

नारायणगाव -  जुन्नर तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनी स्थानिक राजकारणाला नवे वळण दिले आहे. जिल्हा परिषदेच्या ८ पैकी ४ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवत आघाडी घेतली, तर शिवसेना (शिंदे) गटाने ३ जागांवर यश संपादन केले. शिवसेना (ठाकरे) गटाला १ जागेवर समाधान मानावे लागले.

पंचायत समितीच्या १६ गणांमध्ये मात्र शिवसेना (शिंदे) गटाने ८ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसला ७ जागा मिळाल्या असून भाजपाने १ जागा जिंकली. हा भाजप सदस्य शिवसेनेसोबत गेल्यास पंचायत समितीवर पुन्हा भगवा फडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिग्गजांना धक्का

या निवडणुकीत काही प्रमुख नेत्यांना अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला. भाजप नेत्या आणि माजी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या सुना कविता पवार, आमदार शरद सोनवणे यांचे निकटवर्तीय संतोष चव्हाण तसेच जयश्री खंडागळे यांचा पराभव विशेष चर्चेत राहिला.

जिल्हा परिषद गटानुसार निकाल (संक्षेप)

डिंगोरे-उदापूर: सोनाबाई दाभाडे (राष्ट्रवादी) विजयी

ओतूर-धालेवाडी: छाया तांबे (राष्ट्रवादी) विजयी

आळे-पिंपळवंडी: मंगेश काकडे (शिंदे) विजयी

बेल्हे-राजुरी: स्मिता कणसे (शिंदे) विजयी

बोरी बुद्रुक-खोडद: कल्पना काळे (राष्ट्रवादी) विजयी

नारायणगाव-वारूळवाडी: नेहा पाटे (शिंदे) विजयी

सावरगाव-कुसूर: गुलाबराव पारखे (ठाकरे) विजयी

बारव-तांबे: मोनाली लांडे (राष्ट्रवादी) विजयी 

पंचायत समितीत रंगतदार लढती

उदापूर, डिंगोरे, ओतूर आणि धालेवाडी येथे राष्ट्रवादीने विजय मिळवला, तर आळे, पिंपळवंडी, राजुरी, बेल्हे, नारायणगाव, वारूळवाडी, तांबे व खोडद येथे शिवसेना (शिंदे) गटाने बाजी मारली. सावरगावमध्ये भाजप, तर कुसूरमध्ये ठाकरे गटाचा उमेदवार विजयी झाला. राष्ट्रवादीतून शिंदे गटात प्रवेश केलेल्या काही उमेदवारांना पराभवाचा धक्का बसल्याने पक्षांतराचा मुद्दाही चर्चेत आला.
 

प्रतिष्ठेच्या लढतीत मोनाली लांडे विजयी

बारव-तांबे गटात राष्ट्रवादीने मोनाली लांडे यांची उमेदवारी प्रतिष्ठेची केली होती. अजित पवार यांच्या शिफारशीने मिळालेल्या उमेदवारीचे त्यांनी सोने करत विजय मिळवला. त्यांच्या विजयामुळे समर्थकांनी जल्लोष साजरा केला.
 

मतमोजणी व्यवस्थेवर नाराजी

सात फेऱ्या पूर्ण होऊनही निकाल जाहीर करण्यात विलंब झाल्याने पत्रकार आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. माहिती उशिरा दिल्याचा आरोप करण्यात आला.

कर्मचारी जेवणावरही टीका

मतमोजणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या जेवणाच्या दर्जाबाबत असमाधान व्यक्त झाले. भाजीला चव नसल्याची तक्रार अनेकांनी केली.
 
विजयाचा जल्लोष

निकाल जाहीर होताच विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आणि घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला. विजयी उमेदवारांना खांद्यावर घेऊन मिरवणुका काढण्यात आल्या.

Web Title : जुन्नर जेडपी चुनाव: एनसीपी जीती, पंचायत समिति में शिंदे गुट मजबूत

Web Summary : जुन्नर जेडपी चुनाव में एनसीपी ने 4 सीटें जीतीं। शिंदे गुट 8 सीटों के साथ पंचायत समिति में हावी, सत्ता में बने रहने की संभावना। प्रमुख नेताओं को अप्रत्याशित हार का सामना करना पड़ा।

Web Title : Junnar ZP Election: NCP Wins, Shinde Group Strong in Panchayat Samiti

Web Summary : NCP secured victory in Junnar ZP election with 4 seats. Shinde group dominates Panchayat Samiti with 8 seats, potentially holding power. Key leaders faced unexpected defeats.