मंचर: जिल्हा परिषदेच्या तीन व पंचायत समितीच्या आठ जागा जिंकत आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने घवघवीत यश मिळवले आहे. शिवसेना शिंदे पक्ष, शिवसेना उबाठा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यांना जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या 5 पैकी 3 जागा तर पंचायत समितीच्या 10 पैकी 8 जागा मिळवत राष्ट्रवादीने यश संपादन केले आहे. विरोधी पक्षांनी एकत्रित आघाडी केली होती. शिंदेसेना, उद्धवसेना तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवली मात्र त्यांना अपेक्षित यश आले नाही. जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या प्रत्येकी दोन अशा चार जागांवर त्यांना समाधान मानावे लागले आहे. भाजपाने काही जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यातील केवळ बोरघर गणातील सोमा भीमा दाते, पेठ गणातील प्रमोद लक्ष्मण धुमाळ, जारकरवाडी गणातील शैला गोरक्ष भोजने, पिंपळगाव तर्फे महाळुंगे गणातील दादाभाऊ सबाजी थोरात यांना बऱ्यापैकी मते पडली. इतर उमेदवारांना फारसा प्रभाव पडता आला नाही.
पंचायत समितीचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट: 8 जागा
*शिवाजी संपत निघोट: पिंपळगाव गण (5161 मते)*निलेश नामदेव टेमकर: अवसरी गण (5704 मते)
*संजय कोंडीबा पवळे: पेठ गण (4722 मते)*कैलासबुवा भिमाजी काळे: घोडेगाव गण (7709 मते)
*अंकिता अनिल वाळुंज: जारकरवाडी गण (6746 मते)*संजय सिताराम गवारी: बोरघर गण (4852 मते)*ज्योती प्रवीण पारधी: शिनोली गण (5782 मते)
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट: 2 जागा
*श्वेता किरण ढोबळे: पारगाव गण (6170 मते)
*प्रियांका केतन वाघ: चांडोली गण (7452 मते)
जिल्हा परिषद
एकूण जागा 5राष्ट्रवादी अजित पवार गट 3
*विष्णू धर्माजी हिंगे पाटील:अवसरी पिंपळगाव गट (10878 मते)*विवेक प्रतापराव वळसे पाटील: पारगाव निरगुडसर गट.(13809 मते)*शीला राजेंद्र लोहकरे
बोरघर शिनोली गट (10367 मते)
शिवसेना शिंदे गट 1 जागा*सुवर्णा देविदास दरेकर पेठ घोडेगाव गट(11674 मते)
राष्ट्रवादी शरद पवार गट 1 जागा
*प्रीती प्रवीण थोरात (14111 मते)
कळंब चांडोली गट
Web Summary : In Ambegaon, NCP secured victory in Pune ZP & Panchayat Samiti elections. Allies, including Shiv Sena factions, underperformed. BJP failed to win seats. NCP (Ajit Pawar) won major seats, while NCP (Sharad Pawar) secured a few.
Web Summary : आंबेगाँव में, पुणे ZP और पंचायत समिति चुनावों में NCP को जीत मिली। शिवसेना गुटों सहित सहयोगी दलों का प्रदर्शन खराब रहा। BJP सीटें जीतने में विफल रही। NCP (अजित पवार) ने मुख्य सीटें जीतीं, जबकि NCP (शरद पवार) ने कुछ सीटें हासिल कीं।