पुणे : निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी २९९ उमेदवार, तर पंचायत समित्यांच्या १४६ गणांसाठी ५२८ उमेदवार रिंगणात होते. गेल्या वेळेच्या तुलनेत यावेळी मतदानात सुमारे दीड टक्का घट झाली. गेल्या वेळी ७०.३५ टक्के मतदान झाले होते. शनिवारी झालेल्या मतदानानंतर या सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. दरम्यान, मतमोजणी सोमवारी (दि. ९) होणार आहे. सर्वाधिक मतदान राजगड तालुक्यात ७९.३० टक्के, तर सर्वात कमी बारामती तालुक्यात ५४.९० टक्के झाले.
पुण्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीने आघाडी घेतली असून बारामतीतही राष्ट्रवादी पुढे असल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रचार जोमात सुरू होता. मात्र, दुर्दैवाने बारामती येथे प्रचाराला जात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे वातावरण बदलले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व पक्षांनी व उमेदवारांनी जाहीर प्रचार टाळला. ना सभा झाल्या, ना रॅली निघाल्या. केवळ कोपरासभा आणि वैयक्तिक गाठीभेटी घेऊन पत्रके वाटण्यात आली. त्यामुळे ही संपूर्ण निवडणूक जवळपास विनाप्रचार पार पडली. तसेच राज्य निवडणूक आयोगाने देखील मतदान आणि मतमोजणीला दोन दिवसांची मुदतवाढ दिली.
आता येणाऱ्या माहितीनुसार जिल्ह्यात राष्ट्रवादी ७ जागांवर आघाडीवर आहे. भाजप ४ आणि शिवसेना २ जागांवर आघाडीवर आहे. अजितदादांच्या निधनानंतर कोणत्याही पक्षाने प्रचार केला नाही. परंतु राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळणार असल्याची चिन्हे आता तरी दिसू लागली आहेत. आजच निकाल लागणार असून दुपारी दोनपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. सर्वाधिक मतदान मावळ तालुक्यात ४२.११ टक्के, तर भोर तालुक्यात ४१.४८ टक्के झाले. दीड ते साडेतीन वाजण्याच्या काळात मतदानाचा वेग वाढला. साडेतीन वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ५१ टक्के मतदान झाले. मतदान संपेपर्यंत एकूण ६८.८९ टक्के मतदानाची नोंद झाली. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत जिल्ह्यात ७०.३५ टक्के मतदान झाले होते.
Web Summary : Pune ZP polls saw lower turnout. Ajit Pawar's death impacted campaigning. NCP leads in early results, with BJP and Shiv Sena following. Outcome expected by afternoon.
Web Summary : पुणे ZP चुनाव में मतदान कम हुआ। अजित पवार के निधन से प्रचार प्रभावित। शुरुआती नतीजों में NCP आगे, BJP और शिवसेना पीछे। दोपहर तक परिणाम आने की संभावना।