भोर : भोर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दोन जागा भाजपला तर दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळाल्या आहेत. तर पंचायत समितीच्या आठ पैकी चार जागा भारतीय जनता पार्टीला तर चार जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या आहेत. रणजीत शिवतरे यांच्यासह दोन माजी जिल्हा परिषद सदस्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भाजपाला प्रथमच घवघवीत यश मिळाले आहे.
कान्होजी जेधे शासकीय औद्योगिक संस्था येथे आज सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ विकास खरात यांच्या प्रमुख उपस्थिती मतमोजणीला सुरुवात झाली. पहिला निकाल वेळू गणातील भाजपाचे उमेदवार ज्ञानेश्वर पांगारे यांनी १५३४ मतांनी उद्धव ठाकरे गटाचे महेंद्र भोरडे यांचा पराभव करत मिळवला. नसरापूर गणा मधून अजित पवार गटाचे विशाल कोंडे यांनी १२५५ मतांनी भाजपाचे अमोल शिळीमकर यांचा पराभव केला. वेळू नसरापूर या जिल्हा परिषद गटामधून भाजपाचे पोपट सुके यांनी उद्धव ठाकरे गटाचे अनिकेत शिंदे यांचा ७१६ मतांनी पराभव केला.
भोंगवली गणा मधून भाजपाचे रोहन बाठे यांनी अपक्ष उमेदवार अक्षय सोनवणे यांचा ४९८ मतांनी पराभव करत विजय मिळवला. कामथडी गणातुन राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तृप्ती खुटवड यांनी भाजपाच्या नीता इंगुळकर यांचा १४३६ मतांनी पराभव केला. जिल्हा परिषदेच्या कामथडी भोंगवली गटामधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पंचायत समितीचे माजी उपसभापती विक्रम खुटवड यांनी अपक्ष उमेदवार माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे यांचा १७९४ मतांनी पराभव करून विजय मिळवला.
भोलावडे गणातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश बोडके यांनी भाजपाचे काळूराम मळेकर यांचा २९४ मतांनी पराभव केला. शिंदे गणामधून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मनीषा संतोष कंक यांनी भाजपाच्या मनीषा पारठे यांचा २५४० मतांनी पराभव करून विजय मिळवला. जिल्हा परिषद भोलावडे शिंद गटामधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवीण जगदाळे यांनी भाजपाचे माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवळे यांचा ५१४ मतांनी पराभव करून विजय मिळवला.
उत्रोली गणा मधून भाजपाच्या सुषमा विक्रम चव्हाण यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुनीता वरे यांचा ३८२२ मतांनी पराभव केला. कारी गणातुन भाजपाच्या गीता आंबवले यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सारिका कोंढाळकर यांचा २२५९ मतांनी पराभव केला. जिल्हा परिषदेच्या उत्रोली कारी गटातून भाजपाच्या स्वरूपा संग्राम थोपटे यांनी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाच्या जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतारे यांचा ५६५४ मतांनी पराभव करून एक हाती विजय मिळवला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भोर तालुक्यात स्वरूपा थोपटे यांनी सर्वाधिक ५६७४ मताधिक्य घेऊन विजय मिळवला आहे. तर पंचायत समितीच्या भाजपाच्या सुषमा विक्रम चव्हाण यांनी सर्वाधिक ३८२२ मताधिक्य घेऊन विजय मिळवला आहे. माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच जिल्हा परिषदेमध्ये भाजपाला दोन जागा मिळाल्या असून पंचायत समितीमध्ये चार जागा मिळाल्या आहेत. यापूर्वी भाजपाकडे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या जागा कमी होत्या मात्र यावर त्यांनी मुसंडी मारली आहे.
Web Summary : In Bhor, Pune ZP, NCP (Ajit Pawar group) and BJP won two ZP seats each. BJP secured four, and NCP also secured four Panchayat Samiti seats. Uddhav Sena failed to win any seats. BJP gained significant ground.
Web Summary : भोर, पुणे ZP में, NCP (अजित पवार गुट) और BJP ने दो-दो ZP सीटें जीतीं। BJP ने चार और NCP ने भी चार पंचायत समिति सीटें हासिल कीं। उद्धव सेना कोई सीट नहीं जीत पाई। BJP को महत्वपूर्ण लाभ हुआ।