Pune zp : जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापतींची निवड २ एप्रिलला; निवडणूक कार्यक्रम जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 16:14 IST2026-03-25T16:13:46+5:302026-03-25T16:14:32+5:30

या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून हवेलीचे प्रांताधिकारी यशवंत माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

pune zp Election of chairmen of Zilla Parishad subject committees on April 2; Election program announced | Pune zp : जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापतींची निवड २ एप्रिलला; निवडणूक कार्यक्रम जाहीर

Pune zp : जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापतींची निवड २ एप्रिलला; निवडणूक कार्यक्रम जाहीर

पुणे :पुणे जिल्हा परिषदेतील विषय समित्यांच्या नवीन सभापतींची निवड येत्या २ एप्रिल रोजी केली जाणार असून त्यासाठीचा सविस्तर निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून हवेलीचे प्रांताधिकारी यशवंत माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सभापती पदाच्या निवडीसाठी २ एप्रिल रोजी सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली आहे. सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. समाज कल्याण आणि महिला व बालकल्याण या समित्यांसाठी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार असून त्यानंतर उर्वरित दोन सभापती पदांसाठी अर्ज दाखल केले जाणार आहेत.

दुपारी ३ वाजता होणाऱ्या सभेत दाखल उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे. जर निवडून द्यायच्या सभापती पदांपेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले, तर सभेत मतदानाची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

सध्या जिल्हा परिषदेतील सर्व दहा समित्यांचा कार्यभार अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्याकडे आहे. जिल्हा परिषद अधिनियमातील तरतुदीनुसार अध्यक्षांकडे स्थायी समिती व जलसंधारण समितीचे पदसिद्ध अध्यक्षपद आहे. समाज कल्याण व महिला व बालकल्याण या दोन समित्यांसाठी सभापतींची निवड होणार असून त्याशिवाय आणखी दोन सभापती पदांची निवड केली जाणार आहे.

उपाध्यक्ष यापूर्वीच निवडले गेले असून दोन सभापती आणि उपाध्यक्ष या तिघांना मिळून अर्थ, शिक्षण, बांधकाम, आरोग्य, पशुसंवर्धन आणि कृषी या सहा समित्यांचे वाटप केले जाणार आहे. मात्र खाते वाटपासाठी जिल्हा परिषद अध्यक्षांना स्वतंत्रपणे सर्वसाधारण सभा बोलवावी लागणार आहे.

Web Title : पुणे जिला परिषद: समिति सभापतियों का चुनाव 2 अप्रैल को; कार्यक्रम घोषित

Web Summary : पुणे जिला परिषद में समिति सभापतियों का चुनाव 2 अप्रैल को होगा। जिलाधिकारी ने विस्तृत कार्यक्रम की घोषणा की। हवेली के उप-विभागीय अधिकारी को पीठासीन अधिकारी नियुक्त किया गया है। नामांकन उसी दिन दाखिल किए जाएंगे, जिसके बाद जांच और नाम वापसी होगी, और आवश्यकता पड़ने पर मतदान होगा।

Web Title : Pune ZP: Committee Chairpersons Election on April 2; Schedule Announced

Web Summary : Pune Zilla Parishad's committee chairpersons election is scheduled for April 2nd. District Collector announced the detailed program. Haveli's Sub-Divisional Officer is appointed as the presiding officer. Nominations are to be filed on the same day, followed by scrutiny and withdrawal, and voting if necessary.