शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 20:20 IST

आरक्षण झाले जाहीर : इच्छुक सदस्यांची पक्षश्रेष्ठींकडे मोचेर्बांधणी

ठळक मुद्देनिवडणुकीमुळे राज्यातील जिल्हा परिषदेचे आरक्षण पडले होते लांबणीवर

पुणे : पुणे जिल्ह्यात अध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले आहे. यामुळे अनेक इच्छुक सदस्यांनी पक्षश्रेष्ठींकडे ही माळ आपल्याच गळ्यात पडावी म्हणून मोचेर्बांधणी सुरु केली आहे. पक्षश्रेष्ठी या पदासाठी कोणाची निवड करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अध्यक्ष पदाचे आरक्षण मंगळवारी राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता याच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आले. 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील जिल्हापरिषदेचे आरक्षण लांबणीवर पडले होते. अध्यक्षपद आणि सभापतिपदाचे आरक्षण संपल्याने काही महिने त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. याविरोधात काहीजणांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र निवडणुका जाहीर झाल्याने यावर निर्णय होऊ शकला नाही. विधानसभा निवडणुकां आटोपल्या असून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मंगळवारी मुंबईत मंत्रालयात राज्याचे मुख्य सचिव अजय मेहेता यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडतीचे आयोजन करण्यात आले होते.चक्राकार पद्धतीने ही सोडत काढण्यात आली. या वेळी 34 जिल्हा परिषदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. पुणे जिल्ह्यात अध्यक्षपद हे खुल्या प्रवगार्तील महिलेसाठी राखीव झाले आहे.   पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे गेल्या 27 वर्षात खुल्या प्रवगार्साठी आरक्षित होते. खुल्या गटातील महिलेसाठी पद आरक्षित झाल्याने इच्छुक सदस्यांनी ही माळ आपल्या गळ्यात पडावी यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्हा परिषदेत 13 महिला या सर्व साधारण गटातून निवडून आल्या आहेत. यांच्यातून एकाच्या गळ्यात अध्यक्ष पदाची माळ पडणार आहे. कांचन कीर्ती निर्मला पानसरे, कुसुम मांढरे, मीनाक्षी तावरे, रोहिणी तावरे, राणी शेळके, अनिता इंगळे, पूजा पारगे, अर्चना कामठे, कल्पना जगताप, शोभा कदम,  तुलसी भोर, अरुण थोरात, स्वाती पाचुंदकर, सविता बगाटे, सुजाता पवार या महिला सदस्या खुल्या प्रवगार्तील आहेत.राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष पदांसाठीचे आरक्षणाची सोडत : * अनुसूचित जाती (सर्वसाधारण) : सोलापूर, जालना* अनुसूचित जाती (महिला) : नागपूर,  उस्मानाबाद* अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) : नंदुरबार, हिंगोली* अनुसूचित जमाती (महिला) : पालघर, रायगड, नांदेड* नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) : लातूर, कोल्हापूर, वाशीम, अमरावती* नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : ठाणे, सिंधुदुर्ग, सांगली, वर्धा, बीड* खुला (सर्वसाधारण) : रत्नागिरी, नाशिक, धुळे, गडचिरोली, गोंदिया, सातारा, अकोला, भंडारा* खुला (महिला) : जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, परभणी, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसzpजिल्हा परिषद