शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील तरुणांचा मध्यप्रदेशातील रतलाम येथे भीषण अपघात; तिघे जागीच ठार तर चार जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 16:36 IST

मृत्यू झालेल्यांमध्ये कदमवाकवस्तीतील ग्रामपंचायत सदस्यांच्या पतीचा समावेश

ठळक मुद्दे जखमीपैकी तिघांना पुढील उपचारासाठी पुण्यात हलविण्याबाबत विचार विनीयमय सुरु

पुणे: बकरी खरेदी करण्यासाठी मध्यप्रदेशात गेलेल्या पुणे व कदमवाकवस्ती येथील तरुणांचा रतलाम याठिकाणी दुपारी बारा वाजण्याचा सुमारास भीषण अपघात घडल्याची घटना सोमवारी घडली. या भीषण अपघातात पिकअपमध्ये प्रवास करणाऱ्या पुण्यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले. जखमीपैकी एकाची प्रकृती गंभीर असून, जखमींवर रतलाम येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कंटेनर, पिकअप व ट्रॅक्टर अशा तिहेरी वाहनांची धडक होऊन हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती येथील सामाजिक कार्यकर्ते नवनाथ मोहन साळुंखे (वय-३८) यांच्यासह या अपघातात उमर सय्यद, अली सय्यद (रा. पुणे. वय व पुर्ण पत्ता माहीत नाही) हे तीन तरुणांचा अपघातात जागीच मृत्यु झाला. तर राहुल घाडगे, आकाश साळुखे (रा. दोघेही कदमवाकवस्ती ता. हवेली), गुलफाम अन्सारी, नजीर कुरेशी (पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही) हे चार जण या अपघातात जखमी झाले. वरील चार जणांपैकी गुलफाम अन्सारी याची प्रकृती चिंताजणक असुन, जखमींच्यावर रतलाम येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कदमवाकवस्ती येथील नवनाथ साळुखे, राहुल घाडगे, आकाश साळुंखे व त्यांचे पुण्यातील काही मित्र मागील काही वर्षांपासून मध्यप्रदेशातून बकरी खरेदी करुन, त्याची विक्री पुणे व परीसरात करत होते. रविवारीही ते सर्व बकरी खरेदी करण्यासाठी रतलाम मार्गे पुढे जात होते. रतलाम जवळ रस्त्याचे काम चालु असल्याने, वरील रस्त्यावरील वाहतुक स्थानिक पोलिसांनी एकेरी केलेली आहे.

रतलाम जवळून जात असतांना, अचानक पुढून भरधाव वेगात आलेला कंटेनर रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या छोट्या खड्यात झुकला. हा खड्डा चुकवण्याच्या नादात कंटेनर, थेट पिकअपवर जाऊन आदळला. त्याचवेळी पाठीमागून आलेला ट्रॅक्टरही पाठीमागुन पिकअप येऊन आदळला. यात तीघे जागीच ठार झाले असून चार जण जखमी झाले आहेत.

जखमीपैकी गुलफाम अन्सारी वगळता इतर नजीर कुरेशी, राहुल घाडगे, आकाश साळुखे या तिघांना पुढील उपचारासाठी पुण्यात हलविण्याबाबत विचार विनीयमय चालु आहे. गुलफाम अन्सारी यांची प्रकृती मात्र गंभीर असल्याने, त्यांच्यावर रतलाम येथील रुग्नालयातच उपचार सुरु ठेवण्यात येणार आहेत.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातDeathमृत्यूMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस