पुण्यातील तरुणाचा अहमदनगरमध्ये खून; प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 12:46 IST2017-10-24T11:42:55+5:302017-10-24T12:46:56+5:30
प्रेमप्रकरणातून एका तरुणाची हत्या केल्याची घटना अहमदनगर येथे घडली आहे. मृत तरुण पुण्याचा असून त्याचे अपहरण करून खून केल्याचे निदर्शनास आले आहे.

पुण्यातील तरुणाचा अहमदनगरमध्ये खून; प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय
पुणे : प्रेमप्रकरणातून एका तरुणाची हत्या केल्याची घटना अहमदनगर येथे घडली आहे. मृत तरुण पुण्याचा असून त्याचे अपहरण करून खून केल्याचे निदर्शनास आले आहे.
शेखर पाचवे (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. रविवारी (दि. २३) कोथरुडमधून त्याचे अपहरण करण्यात आले. तर अहमदनगर येथील कर्जत या ठिकाणी त्याचा खून करण्यात आला. प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. तर दोन अल्पवयीन मुलांचा पोलीस शोध घेत आहेत.
ही घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. मृत शेखर विवाहित असून त्यास दोन मुले आहेत. परंतु, तरीही आरोपीच्या नातेवाईक मुलीसोबत त्याचे संबध होते. या वरून वाद झाल्याने ही हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. रविवारी दुपारी मृत शेखर घरगुती कामानिमित्त कोथरुड परिसरात आला होता. त्यावेळी आरोपी त्याला समजून सांगण्यासाठी गेले ह़ोते, मात्र त्यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला. आरोपींनी त्याला मारहाण करत चारचाकीमध्ये बसवत अपहरण केले. नगर जिल्ह्यतील कर्जत या गावी घेऊन जाऊन त्याचा निर्घृण खून केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.