शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Pune: इंदापूर गोळीबार प्रकरणातील जखमी तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 21:50 IST

Pune Crime News: इंदापूर गोळीबार प्रकरणातील जखमी राहुल अशोक चव्हाण याचा आज सकाळी पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ससून येथे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या शिरसोडी या गावी आणण्यात येणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर तेथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

इंदापूर - इंदापूर गोळीबार प्रकरणातील जखमी राहुल अशोक चव्हाण याचा आज ( दि.४)सकाळी पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ससून येथे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या शिरसोडी या गावी आणण्यात येणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर तेथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीसांकडे केलेली तक्रार मागे घेण्याच्या कारणावरुन मागील सोमवारी ( दि.३०) सायंकाळी रात्री पावणेसात ते सात वाजण्याच्या दरम्यान इंदापूर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच राहुल चव्हाण याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. इंदापूर व अकलूज येथील खाजगी रुग्णालयात उपचार झाल्यानंतर पुढील उपचारासाठी राहुलला पुण्यात हलवले होते.शरीरात घुसलेल्या तीन गोळ्या काढण्यात डॉक्टरांना यश मिळाले होते. मात्र मणक्यामध्ये घुसलेल्या एका गोळीमुळे मूत्रपिंडामध्ये संसर्ग झाला.परिणामी राहुलची मृत्यूशी चाललेली झुंज संपली. 

या प्रकरणी इंदापूर पोलीसांनी अभिजित बाळकृष्ण चोरमले, क्षितिज बाळकृष्ण चोरमले, प्रकाश हंबीरराव शिंदे, धीरज उर्फ सोन्या हनुमंत चोरमले या चार आरोपींना अटक केली आहे. फरारी असणा-या अशोक केरबा चोरमले,विश्वजित हनुमंत चोरमले,महेश रमेश शिंदे,ओम सोमनाथ ठवरे,सोमनाथ ठवरे (सर्व रा. शिरसोडी,ता.इंदापूर) यां फरारी आरोपींचा शोध सुरू आहे.

ससूनमधील शवविच्छेदन झाल्यानंतर राहुलचा मृतदेह त्याच्या शिरसोडी या मूळगावी आणण्यात येणार आहे. राहुल व आरोपी एकाच गावचे असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी गावात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी