'भावपूर्ण श्रद्धांजली'चे स्वत:चे फोटो स्टेटसला ठेवत आदित्यने उचललं टोकाचं पाऊल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 21:34 IST2023-03-19T21:32:27+5:302023-03-19T21:34:03+5:30
आईवडिलांचा एकुलता एक असलेल्या आदित्यचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते.

'भावपूर्ण श्रद्धांजली'चे स्वत:चे फोटो स्टेटसला ठेवत आदित्यने उचललं टोकाचं पाऊल!
केडगाव: पारगाव तालुका दौंड येथील एका युवकाने भावपूर्ण श्रद्धांजली असे स्टेटस ठेवत केडगाव येथे एक्सप्रेस रेल्वेखाली आत्महत्या केली. घटना रविवार, दिनांक १९ रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली.
आदित्य ओव्हाळ असे त्या युवकाचे नाव असून तो मुळचा आंधळगाव तालुका दौंड येथील एका मोठ्या शेतकरी कुटुंबातील आहे. पारगाव येथे आदीमनी मेडिकल या नावाने त्याचा व्यवसाय प्रचलित होता. आत्महत्या करण्यापूर्वी आदित्यने स्वतःचे एकापाठोपाठ एक असे ११ फोटो स्टेटसला ठेवले व शेवटचा भावपूर्ण श्रद्धांजली असे स्टेटस ठेवत त्याने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. आदित्य हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता नुकतेच काही महिन्यापूर्वी त्याचा विवाह झाला होता. त्याच्या मृत्यूबद्दल परिसरात हळहळ व्यक्त केली आहे.