Pune Crime latest News: पुणे शहरातील एका घटनेचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. एक तरुण एका तरुणीला थापडा, लाथा बुक्क्यांनी मारहाण करत आहे. तरुणी समोर आल्यानंतर तो तिला उडी मारून लाथ मारताना दिसत आहे.
व्हायरल होत असलेली ही घटना पुण्यातील केके मार्केट भागात घडली आहे. ही घटना एका व्यक्तीने उड्डाणपूलावरून मोबाईलमध्ये शूट केली आहे. मंगळवारी रात्री (३० सप्टेंबर) ८ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. पुणे-सातारा महामार्गावरील केके मार्केट ते चव्हाण नगर या रस्त्यावर हा प्रकार घडला.
तरुणीचे केस धरले, कानशिलात मारली नंतर लाथा घातल्या; व्हिडीओ बघा
जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यात तरुणाने तरुणीला कशा पद्धतीने मारले ते दिसत आहे. तरुणी दुसऱ्या तरुणाला पकडताना दिसत आहे. तो त्याच्या हातून निसटून पळून जातो. त्यानंतर तरुणी मारहाण करणाऱ्या तरुणाला पकडण्याचा प्रयत्न करते.
तरुण त्या तरुणीलाच मारत सुटतो. तो तिला आधी कानशिलात मारतो. दोघांमध्ये झटापट होते. त्यानंतर तरुणी त्याच्यापासून दूर जायला लागते. तेव्हा तो तिचे केस पकडून ओढतो. इतकंच नाही, तर उडी मारून तिच्या कमरेत लाथ मारतो.
तरुणी रिक्षात जाऊन बसते. मारहाण करणारा तरुण त्या रिक्षाजवळ जाऊन काहीतरी बोलतो. त्यानंतर तरुणी रिक्षातून उतरते आणि कुणाला तरी फोन लावत पुढे चालत जाते. तरुणही तिच्या मागे जातो. त्यानंतर तरुणी समोर येते तेव्हा तरुण पुन्हा उडी मारून तिला लाथ मारतो.
ही घटना नेमकी कशामुळे घडली, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तरुणीकडूनही अद्याप तक्रार नोंदवली गेलेली नाही.
पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले की, कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. तरीही व्हिडीओच्या आधारे या घटनेची माहिती घेतली जात आहे.
Web Summary : A video shows a young woman being brutally assaulted in Pune's KK Market area. The attacker is seen slapping, kicking, and pulling her hair. Police are investigating the incident, even though no complaint has been filed yet.
Web Summary : पुणे के केके मार्केट इलाके में एक युवती के साथ बेरहमी से मारपीट का वीडियो सामने आया है। हमलावर उसे थप्पड़ मारते, लात मारते और उसके बाल खींचते हुए दिख रहा है। पुलिस मामले की जांच कर रही है, हालांकि अभी तक कोई शिकायत दर्ज नहीं की गई है।