Pune Crime Video: शनिवारी मध्यरात्री पुण्यातील नारायण पेठेत एका तरुणाने गोंधळ घातला. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाने आधी कार चालवत असताना अनेक वाहनांना धडक दिली. त्यानंतर लोकांनी त्याला कारमधून बाहेर काढले, त्यावेळी त्याने हात लावायचा नाही, मी पोलिसाचा मुलगा आहे म्हणत धिंगाणा घातला.
पुण्यातील नारायण पेठ परिसरात शनिवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत कारमधून जात होता. त्याच्यासोबत एक तरुणीही होती. कार चालवत असलेल्या तरुणाने अनेक वाहनांना धडक दिली. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. लोकांनी त्याला कारमधून बाहेर काढले.
कारमधून काढल्यानंतर तरुणाने गोंधळ घालण्यास सुरूवात केली. धक्का लावायचा नाही. मी पोलिसांचा मुलगा आहे, म्हणत त्याने लोकांसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे तिथेच बराच गोंधळ निर्माण झाला. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
तरुणी म्हणाली तो माझा भाऊ
तरुणी या तरुणाला सांभाळताना दिसत आहे. धिंगाणा घालणारा तरुण भाऊ असल्याचे तरुणी बोलताना दिसत आहे. तरुण म्हणत आहे की मला दारू पिऊ द्या. मी पोलिसाचा मुलगा आहे.
काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, कारमध्ये चौघेजण होते. दोन तरुण आणि दोन तरुणी होत्या. चौघेही दारू प्यायलेले होते. तरुणाने कार चालवताना अपंग व्यक्तीला धडक दिल्याचेही म्हटले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस तिथे पोहोचले. त्यानंतर मध्यस्थी करत पोलिसांनी दोन्हीकडच्या लोकांना शांत केली. दोन्हीकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारी पोलिसांनी घेतल्या असून, तपास करून पुढील कारवाई करण्यात येईल. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
Web Summary : A drunk youth in Pune damaged vehicles and created chaos in Narayan Peth, claiming to be a policeman's son. He was accompanied by a woman who identified him as her brother. Police are investigating the incident.
Web Summary : पुणे के नारायण पेठ में एक नशे में धुत्त युवक ने वाहनों को टक्कर मारी और हंगामा किया। उसने खुद को पुलिस वाले का बेटा बताया। उसके साथ एक महिला थी जिसने उसे अपना भाई बताया। पुलिस मामले की जांच कर रही है।