शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

पुणे अनलॉक ५ : हॉटेल्स, रेस्टॉरंट सुरू सोमवारपासून सुरु होणार; 'हे' राहणार मात्र बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 00:13 IST

केंद्र, राज्य आणि महापालिका प्रशासनाने वेळोवेळी परवानगी दिलेल्या आस्थापना यापूर्वी दिलेल्या सवलती नुसार सुरूच राहणार आहेत..

ठळक मुद्देशासनाच्या निर्देशानुसार पालिकेचे आदेश

पुणे : राज्य‌ शासनाच्या मिशन बिगीन अगेन अंतर्गत महापलिकेनेही शहरातील हॉटेल, फुड कोर्ट, रेस्टॉरंट बार आधी येत्या सोमवारपासून (५ ऑक्टोबर) ५० टक्के क्षमतेने सुरू करण्याचे आदेश गुरुवारी रात्री काढले आहे. मात्र अद्यापही शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेस, प्रशिक्षण संस्था, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, नाट्यगृह सुरू करण्यास पूर्णतः बंदी असून, शासनाचे‌ पुढील आदेश येईपर्यंत ते बंदच राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.      राज्य‌ शासनाच्या‌ आदेशानुसार महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढलेल्या आदेशात, शहरातील हॉटेल, फुड कोर्ट, रेस्टॉरंट बार आधी ५ ऑक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यात येतील असे नमूद केले आहे.        केंद्र, राज्य आणि महापालिका प्रशासनाने वेळोवेळी परवानगी दिलेल्या आस्थापना यापूर्वी दिलेल्या सवलती नुसार सुरूच राहणार आहेत. तर प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व प्रतिबंध व नियम पूर्वीप्रमाणेच ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू राहणार आहेत. याचबरोबर सार्वजनिक व कामाच्या ठिकाणी सुरक्षेसंबंधीचे नियम पाळणे बंधनकारकच राहणार आहे. मास्क, सामाजिक अंतर, निर्जंतुकीकरण, गर्दी या संदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.           सार्वजनिक सभा, संमेलने यांना बंदी कायम असून, लग्न समारंभासाठी ५० आणि अंत्यविधीसाठी २० लोकांनाच परवानगी राहणार आहे. दरम्यान शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत शहरातील  शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेस, प्रशिक्षण संस्था, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, नाट्यगृह आदी शासनाचे‌ पुढील आदेश येईपर्यंत बंदच राहणार असल्याचे पालिकेने सांगितले आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकhotelहॉटेल