Pune Unlock 5: Hotels, restaurants to start from Monday; 'It' will be closed | पुणे अनलॉक ५ : हॉटेल्स, रेस्टॉरंट सुरू सोमवारपासून सुरु होणार; 'हे' राहणार मात्र बंद 

पुणे अनलॉक ५ : हॉटेल्स, रेस्टॉरंट सुरू सोमवारपासून सुरु होणार; 'हे' राहणार मात्र बंद 

ठळक मुद्देशासनाच्या निर्देशानुसार पालिकेचे आदेश

पुणे : राज्य‌ शासनाच्या मिशन बिगीन अगेन अंतर्गत महापलिकेनेही शहरातील हॉटेल, फुड कोर्ट, रेस्टॉरंट बार आधी येत्या सोमवारपासून (५ ऑक्टोबर) ५० टक्के क्षमतेने सुरू करण्याचे आदेश गुरुवारी रात्री काढले आहे. मात्र अद्यापही शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेस, प्रशिक्षण संस्था, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, नाट्यगृह सुरू करण्यास पूर्णतः बंदी असून, शासनाचे‌ पुढील आदेश येईपर्यंत ते बंदच राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. 
     राज्य‌ शासनाच्या‌ आदेशानुसार महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढलेल्या आदेशात, शहरातील हॉटेल, फुड कोर्ट, रेस्टॉरंट बार आधी ५ ऑक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यात येतील असे नमूद केले आहे. 
       केंद्र, राज्य आणि महापालिका प्रशासनाने वेळोवेळी परवानगी दिलेल्या आस्थापना यापूर्वी दिलेल्या सवलती नुसार सुरूच राहणार आहेत. तर प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व प्रतिबंध व नियम पूर्वीप्रमाणेच ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू राहणार आहेत.
 याचबरोबर सार्वजनिक व कामाच्या ठिकाणी सुरक्षेसंबंधीचे नियम पाळणे बंधनकारकच राहणार आहे. मास्क, सामाजिक अंतर, निर्जंतुकीकरण, गर्दी या संदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. 
          सार्वजनिक सभा, संमेलने यांना बंदी कायम असून, लग्न समारंभासाठी ५० आणि अंत्यविधीसाठी २० लोकांनाच परवानगी राहणार आहे. दरम्यान शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत शहरातील  शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेस, प्रशिक्षण संस्था, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, नाट्यगृह आदी शासनाचे‌ पुढील आदेश येईपर्यंत बंदच राहणार असल्याचे पालिकेने सांगितले आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Pune Unlock 5: Hotels, restaurants to start from Monday; 'It' will be closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.