पुणे विद्यापीठाच्या संख्याशास्त्राचे विद्यार्थी म्हणतायेत राज्यात भाजपाला मिळेल 'इतक्या' जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 06:32 PM2019-05-22T18:32:17+5:302019-05-22T18:36:45+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी “रॅंडम फॉरेस्ट मॉडेल” ही पद्धती वापरून लोकसभा निवडणुकांचे “एक्झिट पोल” दिले आहेत.

pune university students prediction about lok sabha election | पुणे विद्यापीठाच्या संख्याशास्त्राचे विद्यार्थी म्हणतायेत राज्यात भाजपाला मिळेल 'इतक्या' जागा

पुणे विद्यापीठाच्या संख्याशास्त्राचे विद्यार्थी म्हणतायेत राज्यात भाजपाला मिळेल 'इतक्या' जागा

Next

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी “रॅंडम फॉरेस्ट मॉडेल” ही पद्धती वापरून लोकसभा निवडणुकांचे “एक्झिट पोल” दिले आहेत. या एक्झिट पाेलनुसार राज्यात भाजपाला  (१७ ते २३), शिवसेना (१६ ते २१), राष्ट्रवादी काँग्रेस (३ ते ९), काँग्रेस (१ ते ६) जागा मिळण्याची शक्यता आहे. निवडणुकांचे अंदाज देण्यासाठी ही पद्धत भारतात पहिल्यांदाच वापरण्यात आली आहे.

या विभागातील एम.एस्सी. द्वितीय वर्षाचे विद्यार्थी श्री. विनय तिवारी, श्री. आर. विश्वनाथ व श्री. शरद कोळसे या तीन विद्यार्थ्यांनी असिस्टंट प्रोफेसर डॉ. आकांक्षा काशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अंदाज दिले आहेत. त्यासाठी लागणारी आकडेवारी त्यांनी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून मिळवली, तर जनमानसाचा सध्याचा कल ओळखण्यासाठी आवश्यक असलेली माहिती “सीएसडीएस – लोकनीती” यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या सर्वेक्षण अहवालांमधून घेतली आहे. या माहितीमध्ये सध्याच्या सरकारच्या कामगिरीबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया, पंतप्रधानपदाच्या संभाव्य उमेदवारांची लोकप्रियता, मागच्या निवडणुकीतील आपले मत यंदा बदलू इच्छिणारे मतदार यांचा समावेश आहे.

या अंदाजांसाठी रॅंडम फॉरेस्ट मॉडेल वापरण्यापूर्वी त्याच्या आधारावर २००९ आणि २०१४ च्या निवडणुकांचे अंदाज पडताळून पाहण्यात आले. हे अंदाज प्रत्यक्ष निकालांशी पडताळून पाहिले असता ते उमेदवारांच्या विजय / पराभवाबद्दल जवळजवळ ९६ टक्के जुळत असल्याचे पाहायला मिळाले आहे. ही अचूकता इतर कोणत्याही मॉडेलच्या तुलनेत सर्वाधिक आहे. विशेषतः २०१४ च्या निवडणुकांमधील इतर अनेक एक्झिट पोलच्या निकालांपेक्षा हे निकाल अधिक अचूक असल्याचे दिसून आले. म्हणूनच या अभ्यासात माहितीच्या विश्लेषणासाठी या पद्धतीचा वापर करून घेण्यात आला, असे डॉ. काशीकर यांनी सांगितले. यावरून महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवला आहे. 

Web Title: pune university students prediction about lok sabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.