Pune University to set up Marathi Language, Literature, Culture, Study Center: Vice Chancellor Dr. Nitin Karmalak's announcement | पुणे विद्यापीठ मराठी भाषा साहित्य, संस्कृती, अभ्यास केंद्र उभारणार : कुलगुरू डॉ. नितीन करमळकरांची घोषणा

पुणे विद्यापीठ मराठी भाषा साहित्य, संस्कृती, अभ्यास केंद्र उभारणार : कुलगुरू डॉ. नितीन करमळकरांची घोषणा

पुणे: मराठी भाषा दिवस हा एका दिवसासाठी मर्यादित न राहता सर्व दिवस तो साजरा व्हावा, यासाठी विद्यापीठ कायम प्रयत्नशील आहे. त्यामुळेच लवकरच विद्यापीठात मराठी भाषा साहित्य, संस्कृती, अभ्यास व विकास विषयक केंद्र उभारले जाईल,अशी घोषणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी शनिवारी केली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळातर्फे मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित ‘भाषा संगीताची ’ या कार्यक्रमात डॉ. नितीन करमळकर बोलत होते. कार्यक्रमास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय चाकणे, मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. प्रभाकर देसाई, विद्यार्थी विकास मंडळाचे डॉ.संतोष परचुरे उपस्थित होते.

कार्यक्रमात गायिका शुभांगी नितीन मुळे यांनी ‘भाषा संगीताची ’ हा सांगीतिक कार्यक्रम सादर केला. त्यांना हेमंत वाळुंजकर यांनी गायनात सहकलाकार म्हणून साथ दिली. त्यांनी विठ्ठला तू वेडा कुंभार, देव देव्हाऱ्यात नाही, कानडा राजा पंढरीचा, बाई मी विकत घेतला शाम आदी भक्तीगीते सादर केली.त्यांना हार्मोनियमवर जयंत साने, तबल्यावर मोहन पारसनीस यांनी आणि वादनसाहाय्य रोहन करंदीकर यांनी साथ दिली.        

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Pune University to set up Marathi Language, Literature, Culture, Study Center: Vice Chancellor Dr. Nitin Karmalak's announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.