पुणे विद्यापीठातील वादग्रस्त नाटक भोवलं; ललित कला केंद्राचे डॉ. प्रवीण भोळेंसह ६ जणांना अटक

By नितीश गोवंडे | Published: February 3, 2024 03:56 PM2024-02-03T15:56:23+5:302024-02-03T15:58:41+5:30

नाटकातील संवादातून भावना दुखावल्याच्या आरोपावरून ललित कला केंद्राचे विभागप्रमुख प्रवीण भोळे यांच्यासह सहा जणांना चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली...

Pune University Controversial Drama Bhowal; Fine Arts Center's Dr. 6 people arrested including Praveen Bhole | पुणे विद्यापीठातील वादग्रस्त नाटक भोवलं; ललित कला केंद्राचे डॉ. प्रवीण भोळेंसह ६ जणांना अटक

पुणे विद्यापीठातील वादग्रस्त नाटक भोवलं; ललित कला केंद्राचे डॉ. प्रवीण भोळेंसह ६ जणांना अटक

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सायंकाळी रामायणातील व्यक्तिरेखा असलेल्या नाटक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडले. नाटकातील संवादातून भावना दुखावल्याच्या आरोपावरून ललित कला केंद्राचे विभागप्रमुख प्रवीण भोळे यांच्यासह सहा जणांना चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली.

याप्रकरणी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते हर्षवर्धन सुनील हरपुडे (२२ रा. मनोरत्न अपार्टमेंट, अरण्येश्वर) याने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार ललित केंद्राचे प्रमुख डॉ. प्रवीण दत्तात्रय भोळे, भावेश पाटील, जय पेडणेकर, प्रथमेश सावंत, ऋषीकेश दळवी, यश चिखले यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. २) सायंकाळी सातच्या सुमारास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललीत कला केंद्रात घडली आहे.

नाटकामुळे भावना दुखावल्याची ABVP ची तक्रार-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांचे रामायणातील व्यक्तिरेखा असलेले नाटक शुक्रवारी सायंकाळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी बंद पाडले. नाटकातील पात्रांच्या तोंडी आक्षेपार्ह संवाद होते, तसेच भावना दुखावल्याचा आरोप अभाविपकडून करण्यात आला. याप्रकरणी अभाविपकडून तक्रार देण्यात आली.

विभाग प्रमुख डॉ. भोळे यांच्यासह सहा जणांना अटक-

ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांनी रामायणातील व्यक्तीरेखांवर नाटक सादर केले. या नाटकात भावना दुखावणारे संवाद असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून विभाग प्रमुख डॉ. भोळे यांच्यासह सहा जणांना अटक केली, अशी माहिती परिमंडळ ४ चे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली. भोळे विभाग प्रमुख आहेत. नाटक सादर करण्यापूर्वी किमान त्यांनी संहिता वाचायला हवी होती. सामाजिक भावना दुखवत समाजात तेढ निर्माण करणे हा दखलपात्र गुन्हा असल्याचे मगर यांनी स्पष्ट केले. याप्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

‘जब वुई मेट’मुळे वाद-

शुक्रवारी ललित केंद्राच्या येथील ओपन थिएटर येथे ४ नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. पहिले दोन नाटके सुरळीत पार पडली. त्यानंतर रामायणावर आधारित ‘जब वुई मेट’ नावाचे नाटक सादर करण्यात येत होते. यात सीतेचा अभिनय करणार मुलगा सिगारेट पिताना दाखवण्यात आला तसेच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत होता. तसेच रामाची तुलना राखी सावंतशी करण्यात येत होती. तसेच नाटकातील लक्ष्मणाचे पात्र हे रावणाची मालीश करत असल्याचे दाखवण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शी विद्यार्थांनी सांगितले.

Web Title: Pune University Controversial Drama Bhowal; Fine Arts Center's Dr. 6 people arrested including Praveen Bhole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.