पुणे : पूर्व वैमनस्यातून दोघा गुन्हेगारांचा खून

By विवेक भुसे | Updated: November 12, 2022 09:52 IST2022-11-12T09:50:56+5:302022-11-12T09:52:13+5:30

येरवड्यातील पांडु लमाण वस्तीतील पहाटेची घटना

Pune Two criminals killed due to previous enmity | पुणे : पूर्व वैमनस्यातून दोघा गुन्हेगारांचा खून

पुणे : पूर्व वैमनस्यातून दोघा गुन्हेगारांचा खून

पुणे : १४ वर्षांपूर्वी केल्या गेलेल्या गोळीबाराचा बदला घेण्यासाठी १० ते १२ जणांच्या टोळ्याने दोघा गुंडावर सपासप वार करुन त्यांचा खून केल्याची घटना समोर आली आहे. अनिल ऊर्फ पोपट वाल्हेकर आणि सुभाष ऊर्फ किसन राठोड यांची खून झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

ही घटना येरवड्यातील लक्ष्मीनगरमधील पांडु लमाण वस्तीतील श्वेता चव्हाण यांच्या कार्यालयासमोर पहाटे ३ वाजता घडली. याप्रकरणी सुभाष राठोड यांचा भाऊ लक्ष्मण राठोड याने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष राठोड याने २००८ -०९ च्या दरम्यान शंकर चव्हाण यांच्यावर फायरिंग केले होते. त्या गुन्ह्यात शिक्षा भोगून राठोड बाहेर आला होता.

अनिल वाल्हेकर, सुभाष राठोड व आणखी एक जण पहाटेच्या सुमारास मोटारसायकलवरुन जात होते. त्यावेळी १० ते १२ जणांच्या टोळक्याने त्यांना वाटेत अडविले. त्यांच्याबरोबरच तिसरा तेथून पळून गेला. या टोळ्याने दोघांवर सपासप वार करुन त्यांचा खून केला. सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती माहिती पोलिसांना समजली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी पहाटे घटनास्थळाला भेट दिली. येरवडा पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Web Title: Pune Two criminals killed due to previous enmity