शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
3
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
4
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
5
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
6
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
7
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
8
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
9
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
10
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
11
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
12
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
13
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
14
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
15
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
16
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
17
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
18
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
19
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
20
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास

Pune Traffic : वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे स्वारगेट चौकाला कोंडीचे ग्रहण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 15:43 IST

-स्वारगेट चौकातून जाणाऱ्या पादचाऱ्याला कोणी रस्ता देता का रस्ता?

-रिक्षा, खासगी ट्रॅव्हल्स, एसटीचालकांना कधी शिस्त लागणार?-दिवसभरात लाखो वाहनांची ये-जा; पण शिस्तीचा अभावपुणे : शहराचे मध्यवर्ती ठिकाण म्हणजे स्वारगेट. या चौकातून दररोज लाखो वाहनांची ये-जा असते. शिवाय बाहेर गावावरुन येणाऱ्या हजारे प्रवासी याच ठिकाणावरुन पुढे जातात. मुख्य स्वारगेट बसस्थानक, शेजारीच पीएमपी थांबा, रिक्षाचालकांची बेशिस्त, ट्रव्हल्सवाल्यांचा मुजोरपणा शिवाय बेशिस्तपणांचा कळस म्हणजे सिग्नल सुरु असले तरी बिनधास्तपणे सिग्लन तोडून पुढे जाणे. यामुळे या चौकात दिवसभर वाहतूक कोडी होते. त्यामुळे चौक पार करताना प्रवाशांना दिव्य कसरत करावा लागत आहे. या चौकाला लागलेली कोंडीचे ग्रहण कधी सुटणार असा प्रश्न पडला आहे.शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या स्वारगेट चौकात चारही बाजूने वाहनांची ये-जा सुरु असते. मुख्य प्रवेशद्वार असल्यामुळे या चौकात दिवसरात्र वाहनांची वर्दळ असते. सकाळी आठ ते रात्री दहापर्यंत तर चौक ओलांडून जाणे म्हणजे पादचाऱ्यांना दिव्य कसरत करावा लागतो. परंतु या सर्व गोष्टीला बेशिस्त वाहनचालकच जबाबदार असून, या ठिकाणची कोंडी कधी सुटणार आणि वाहनधारकांना कधी शिस्त लागणार असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत. तसेच शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, कात्रज रस्ता, हडपसर रस्ता, सिंहगड रस्ता यांच्या मध्यभागी हा चौक येतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणत वाहनांची या चौकातून वर्दळ असते. त्याचबरोबर जवळच प्रसिद्ध व्यापारी पेठा, प्रशासकीय इमारती, स्वारगेट बसस्थानक, शिक्षण संस्था असल्याने सहजकीच नागरिकांची मोठ्या प्रमाणात या भागात ये-जा असते. स्वारगेट चौकात एसटीचे प्रमुख बसस्थानक असल्यामुळे दिवसभरात हजारो एसटी या ठिकाणावरुन ये-जा करतात. परंतु बसस्थानकात जागा कमी असल्यामुळे सकाळी व संध्याकाळी बाहेरपर्यंत लांब रांगा लागते. त्यामुळे वाहतूक कोंडी होते.एसटीच्या बसस्थानकाबाहेर रांगास्वारगेट बसस्थानकातून संध्याकाळी ये-जा करणाऱ्या एसटीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातुलनेत बसस्थानकात जागा कमी आहे. शिवाय बसचालक वाटेल तसे एसटी उभी करतात. त्यामुळे मागून येणाऱ्या एसटीला बसस्थानकात जाण्यासाठी जाग नसते. त्यामुळे बसस्थानकबाहेर बस उभे करतात. जशी संख्या वाढेल तसे बसची रांग लांबत जाते. त्यामुळे रस्ता पूर्ण अडवला जातो. याचा मनस्ताप सर्वसामान्य नागरिकांसह प्रवाशांना सहन करावा लागतो.रिक्षा, खासगी ट्रॅव्हल्सचालकांची बेशिस्तएसटीच्या प्रवाशांना घेण्यासाठी भर चौकात रिक्षाचालकांनी रिक्षा उभे करतात. त्यामुळे रस्त्यामध्ये वाहतूककोंडी होते. शिवाय संध्याकाळी या चौकातून जाणाऱ्या वाहनांची सख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे रस्ता कमी आणि वाहने जास्त अशी परिस्थिती असते. तर दुसरीकडे खासगी ट्रॅव्हल्स भर चौकात उभ्या असतात. त्यामुळे हडपसरकडे जाणारा रास्ता गर्दीमुळे जम होते. परिणामी चौकात कोंडी होते. यामुळे रिक्षाचालक आणि खासगी ट्रॅव्हल्सधारकांना शिस्त कधी लावणार असा प्रश्न पडला आहे.मेट्रोच्या कामाचाही मनस्तापस्वारगेट चौकात अजूनही मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे बसस्थानकाशेजारी बॅरिकेट्स लावण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना येथून मार्गक्रमण करताना कसरत करावी लागते, त्यातच बेशिस्त रिक्षाचालकांमुळे नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागते. भाडे मिळवण्यासाठी स्वारगेट चौकात साधारणतः तीनशेच्या आसपास रिक्षा उभ्या असतात. एकाच ठिकाणी रिक्षा मोठ्या प्रमाणात गोळा होतात, त्यामुळे सर्व शहराच्या मध्यवर्ती भागातील स्वारगेट चौक कायमच राहदरीने व्यापला जातो. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रचंड वाहतूक कोंडी होते.हे आहेत वाहतूक कोंडीचे कारणे- मोठ्या प्रमाणात खासगी ट्रॅव्हल्स भर चौकात उभ्या असतात.-स्वारगेट बसस्थानकाचे योग्य व्यवस्थापन नाही.-खासगी रिक्षाचालकांची संख्या मोठ्या प्रमाणात.-खासगी वाहनांची वाढलेली बेसुमार संख्या.-पोलीस प्रशासनाचे वाहतूक नियोजनत अपयश-मेट्रोची सुरु असलेली कामे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस