पुणे: सरकारी महिला वकिलाला धमकी, लष्कर पोलिसांनी केला गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 12:06 IST2017-10-05T12:06:02+5:302017-10-05T12:06:55+5:30

तुला नंतर बघून घेते अशी धमकी देणा-या महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Pune: Threats to government women advocates, Army police filed complaint | पुणे: सरकारी महिला वकिलाला धमकी, लष्कर पोलिसांनी केला गुन्हा दाखल

पुणे: सरकारी महिला वकिलाला धमकी, लष्कर पोलिसांनी केला गुन्हा दाखल

पुणे : खटला योग्यरित्या चालवला नाही, असा समज झाल्याने सरकारी महिला वकिलास शिवीगाळ करून धमकी देणा-या महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पुणे कॅन्टोन्मेंट न्यायालयात काल (बुधवारी) घडली. रिना कोहली असे या आरोपी महिलेचे नाव आहे.

कॅन्टोन्मेंट न्यायालयात एका अपघाताच्या केसची तारीख होती, त्यात आरोपी महिला फिर्यादी आहे. ही केस सरकारी पक्षाकडून महिला वकील चालवत होत्या. त्यात त्यांनी आपली बाजू व्यवस्थित मांडली नाही, असा समज आरोपी महिलेचा झाला. त्यानंतर त्यांनी वकिलांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना शिवीगाळ करून तुला बघून घेते असे म्हणून धमकी दिली. 

लष्कर पोलिसांनी रिना कोहलीविरुद्ध  सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी  गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Pune: Threats to government women advocates, Army police filed complaint