पुणे : नाना पेठेत दुमजली वाड्याची भिंत कोसळली; दोन जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 14:00 IST2022-07-12T13:56:46+5:302022-07-12T14:00:42+5:30
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरात पाऊस सुरू आहे. शहरात रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. ...

पुणे : नाना पेठेत दुमजली वाड्याची भिंत कोसळली; दोन जण गंभीर जखमी
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरात पाऊस सुरू आहे. शहरात रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. अशात शहरातील ३८६ नाना पेठ, मॉर्डन बेकरीसमोर एका दुमजली वाड्यातील घराची भिंत कोसळली आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. इतर अन्य दोघांची (महिला व पुरुष) दलाचे जवान पोहोचताच सुखरुप सुटका करण्यात आली आहे.
गेल्या चार दिवसांपासून पुणे शहरासह ग्रामीण भागातही मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत आहे. तसेच अनेक घरांच्या पडझडीच्या घटनाही समोर येत आहे. अशीच एक घटना पहाटेच्या सुमारास नाना पेठेत घडली. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत.
मदतीसाठी आलेल्या अग्निशमन दलात अधिकारी प्रदीप खेडेकर व जवान चंद्रकांत गावडे, मनीष बोंबले , महेंद्र कुलाळ, विठ्ठल शिंदे, चंदकांत मेनसे, दिंगबर बांदिवडेकर, शिर्के व चालक अतुल मोहिते आणि कर्णे यांचा समावेश होता.