शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

रामटेकडी कब्रस्तानातून अर्भकाचे प्रेत गायब..! कोणी आणि का गायब केले ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 18:23 IST

कब्रस्तानमध्ये एक कबर उकरलेली असल्याचे पाहिले. त्यांनी तात्काळ याबाबत इतरांना माहिती दिली असता

पुणे - रामटेकडी येथील बागेनूर कब्रस्तानमध्ये दफन केलेल्या अर्भकाचे प्रेत गायब झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, महानगरपालिकेच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अर्भकाचे प्रेत नेमके कोणी आणि का गायब केले? असा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर सुरक्षानगर येथील नसीम नजीर शेख (वय ६५) यांच्या नात अफिसा अल्ताफ शेख (वय २०, रा. सांगोला, सोलापूर) हिची १ मार्च रोजी काशेवाडी येथील पालिकेच्या सोनवणे हॉस्पिटलमध्ये प्रसूती झाली. परंतु, जन्मत:च मृत असलेल्या बाळाला विधीवत रामटेकडी येथील बागेनूर कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आले.  घटनास्थळी नियमित नमाज पठनासाठी येणारे स्थानिक रहिवासी फारूक शेरू शेख यांनी ६ मार्च रोजी कब्रस्तानमध्ये एक कबर उकरलेली असल्याचे पाहिले. त्यांनी तात्काळ याबाबत इतरांना माहिती दिली असता दफन केलेले अर्भक गायब झाल्याचे उघडकीस आले. या घटनेनंतर नसीम शेख यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०१ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजीत आदमाने यांनी दिली.  दरम्यान, पुणे महानगरपालिकेने सर्व स्मशानभूमी आणि दफनभूमींमध्ये सुरक्षारक्षक नियुक्त केले असतानाही घडलेल्या या घटनेमुळे प्रशासनाचा ढिसाळपणा समोर आला आहे. या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे.  

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस