शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात;एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; गावावर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 19:28 IST

अपघाताचा प्रचंड आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. मात्र, लहानगा युवांश याचा जागीच मृत्यू झाला

कवठे येमाई ( पुणे जि ) : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील अष्टविनायक महामार्गावर काळूबाई नगर परिसरात बंटी ढाब्याजवळ रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात अहिल्यानगर जिल्ह्यातील वडनेर (ता. पारनेर) येथील वाजे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.मृतांमध्ये ज्ञानेश्वर मकाजी वाजे (वय ३८), त्यांच्या मातोश्री शांताबाई मकाजी वाजे (वय ६८) आणि मुलगा युवांश ज्ञानेश्वर वाजे (वय ५) यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर वाजे हे आपली आई आणि लहान मुलासह मुंबईहून दुध वाहतूक करणाऱ्या टँकरमधून (एमएच १६ सीडी ९८१९) गावाकडे परतत होते.

पहाटे कवठे येमाई येथील बंटी हॉटेलजवळ त्यांच्या टँकरने मालवाहू ट्रकला (एमएच ४२ बी ८८६६) जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, टँकर थेट ट्रकमध्ये घुसला.अपघाताचा प्रचंड आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. मात्र, लहानगा युवांश याचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी असलेल्या शांताबाई आणि ज्ञानेश्वर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. टँकर चालक जखमी असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या अपघातामुळे वडनेर गाव आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. टाकळी हाजी पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र पोलिसांकडून तपास सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघात