Dattatray Gade Arrested : खूप भूक लागली, खायला द्या, पाणी द्या; नातेवाईकांच्या घरी जाऊन सरेंडर व्हायचंय म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 08:36 IST2025-02-28T08:34:20+5:302025-02-28T08:36:16+5:30

Pune Rape Accused Arrested: पुण्यातील स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला शिरुर तालुक्यातील गुनाट या गावातून अटक केली.

Pune Swargate case accused Dattatray Gade had demanded to be fed at night at a relative's house | Dattatray Gade Arrested : खूप भूक लागली, खायला द्या, पाणी द्या; नातेवाईकांच्या घरी जाऊन सरेंडर व्हायचंय म्हणाला...

Dattatray Gade Arrested : खूप भूक लागली, खायला द्या, पाणी द्या; नातेवाईकांच्या घरी जाऊन सरेंडर व्हायचंय म्हणाला...

Dattatray Gade Arrested  ( Marathi News)  : पुण्यातील स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला शिरुर तालुक्यातील गुनाट या गावातून अटक केली. गेल्या दोन दिवसापासून पोलिसांनी आरोपीच्या शोधात होते. पण, आरोपीचा मोबाईल बंद असल्यामुळे शोधमोहिमेत अडथळा येत होता. स्वारगेट बसस्थानकाल २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर आरोपी त्याच्या गावात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यामुळे पोलिसांनी त्याच्या गावातच त्याचा शोध सुरू केला. अखेर आरोपीला मध्यरात्री शेतातून अटक करण्यात आली आहे. 

शेतात कपडे सापडले, पोलिसांना संशय आला; मध्यरात्री चक्र फिरवली, स्वारगेट प्रकरणातील आरोपी कसा सापडला?

आरोपीचा मोबाईल बंद असल्यामुळे तो पोलिसांना ट्रॅक होत नव्हता. पण तो शिरुर तालुक्यातील गुनाट या गावी अनेकांना दिसला होता. यामुळे पोलिसांनी आरोपीचा शोध त्याच परिसरात घेतला. काल दिवसभर आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध शेतात घेतला. यासाठी ड्रोनचा वापरही केला, पण यात पोलिसांना अपयश आले. पण पोलिसांनी शोधमोहिम थांबवली नाही. रात्रीही शोध सुरूच ठेवला. आरोपी काहीतरी खाण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी बाहेर येणार हे नक्की होते, यामुळे पोलिसांनी शोधमोहिम सुरू ठेवली. 

रात्री उशीरा नातेवाईकांच्या घरी मदत मागायला गेला

गुनाट गावातील एका नातेवाईकाच्या घरी आरोपी दत्तात्रय गाडे रात्री १२ वाजता गेला होता. यावेळी त्याने तिथे खूप भूक लागली आहे. काहीतरी खायला द्या. यावेळी नातेवाईकांनी त्याला काही खायला न देता एक पाण्याची बाटली भरुन दिली. यावेळी गाडे याने मी जे केलं ते चुकीचं केलं, मला पश्चाताप झाला आहे, पोलिसांना सरेंडर व्हायचं आहे, असं म्हणाला. त्यानंतर तो पाण्याची बाटली घेऊन तिथून निघून गेला. यानंतर नातेवाईकांनी ही सर्व माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी लगेचच चक्रे फिरवत आसपासच्या शेतात त्याचा शोध घेतला. रात्री दीड वाजता पोलिसांना तो शेतात सापडला.    

शेतात कपडे सापडले यामुळेच पोलिसांना संशय आला

गुरुवारी पोलिसांनी दिवसभर आरोपी दत्तात्रय गाडे याचा युद्धपातळीवर शोध सुरू केला होता. स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तो आपल्या गुणाट या गावी गेला असल्याचे समोर आले होते. गावकऱ्यांनीही पोलिसांना मदत केली. दिवसभर शोधमोहिम करुन आरोपी पोलिसांना सापडला नव्हता. रात्र झाल्यानंतर पोलिसांनी शोधमोहिम बंद केली नाही, रात्रीही त्याला शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले. शेतात त्याचे कपडे सापडल्यामुळे तो याच शिवारात असल्याचा पोलिसांना संशय आला. यानंतर पोलिसांना आणखी शोध वाढवला. 

Web Title: Pune Swargate case accused Dattatray Gade had demanded to be fed at night at a relative's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.