पुण्यात स्टोव्हचे दिवस परतले...! लोकांनी अडगळीत, पोटमाळ्यावर ठेवलेले स्टोव्ह दुरुस्तीसाठी आणले...

By हेमंत बावकर | Updated: March 27, 2026 10:56 IST2026-03-27T10:54:22+5:302026-03-27T10:56:16+5:30

Pune Stove Repairing Shops : पुण्यात इंधन टंचाईमुळे स्टोव्हचा वापर वाढला. गॅस सिलिंडरच्या मर्यादेमुळे पुणेकरांनी काढले जुने स्टोव्ह. रेशनवर ६० रुपये लिटरने रॉकेल उपलब्ध. वाचा सविस्तर वृत्त.

Pune Stove Repairing Shops: The days of stoves are back in Pune...! People brought their stoves, which were kept in the attic, for repair... | पुण्यात स्टोव्हचे दिवस परतले...! लोकांनी अडगळीत, पोटमाळ्यावर ठेवलेले स्टोव्ह दुरुस्तीसाठी आणले...

पुण्यात स्टोव्हचे दिवस परतले...! लोकांनी अडगळीत, पोटमाळ्यावर ठेवलेले स्टोव्ह दुरुस्तीसाठी आणले...

इराण-अमेरिका, इस्रायल युद्धामुळे जगभरात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारत कशीबशी आपली जहाजे बाहेर काढत आहे. परंतू, देशासमोर इंधन टंचाईचे संकट उभे ठाकलेले आहे. केंद्र सरकारच्या मालकीच्या एलपीजी गॅस पुरवठादार कंपन्यांनी दोन सिलिंडरमधील बुकिंगचा कालावधी वाढविला आहे. शहरात २५ दिवस आणि ग्रामीण भागात ४५ दिवसांवर केल्याने आता लोकांना लाकडाच्या चुली आणि रॉकेलवर चालणारे स्टोव्ह काढण्यास सुरुवात केली आहे. 

हे चित्र छोट्या शहरातील किंवा ग्रामीण भागातील नसून पुण्यातील आहे. रेशनवर सरकारने रॉकेल पुन्हा उपलब्ध करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे गॅस टंचाई आणि गॅस वाचविण्यासाठी लोकांनी घरातील अडगळीत पडलेले आणि पोटमाळ्यावर ठेवलेले जुने स्टोव्ह दुरुस्त करण्यास सुरुवात केली आहे. 

रॉकेल रेशन दुकानावर उपलब्ध होऊ लागले आहे. याचे दर लीचरमागे ६० रुपये असल्याचे या लोकांनी सांगितले. तसेच काळ्या बाजारातही रॉकेल मिळते, त्यासाठी १००-१२० रुपये मोजावे लागतात असेही त्यांनी सांगितले. 

कधी कशाची गरज लागेल...
आज कधी कशाची गरज लागेल याबाबत काहीच सांगता येणार नाही अशी परिस्थिती आहे. एलपीजी आल्याने रॉकेलवरील स्टोव्ह बंद झाले होते. यामुळे त्यांना लागणारे सुटे पार्ट जसे की स्टोव्हची पिन, पंप करण्यासाठी लागणारे आतील वायसर, बर्नर, चावी आदी गोष्टी कंपन्यांनी बनविणे बंद केले होते. आता पुन्हा त्याची मागणी आली आणि लोकांकडून शोधाशोध सुरु झाली आहे. या जुन्या दुकानदारांकडे देखील ते पुरेसे उपलब्ध नाहीय. भविष्यात युद्ध वाढले आणि इंधन टंचाई झालीच तर मात्र या गोष्टींची पुन्हा मागणी वाढण्याची शक्यता असल्याचे या दुकानदारांनी सांगितले. 

Web Title : ईंधन संकट के बीच पुणे में स्टोव फिर से जीवित, स्पेयर पार्ट्स की खोज।

Web Summary : बढ़ती गैस की कीमतों और संभावित ईंधन की कमी के कारण पुणे के निवासी पुराने केरोसिन स्टोव को साफ कर रहे हैं। एलपीजी सिलेंडरों के लिए बुकिंग का समय बढ़ने और राशन वाले केरोसिन की उपलब्धता ने इन पुराने उपकरणों को पुनर्जीवित करने के लिए प्रेरित किया है। अब पार्ट्स की मांग है।

Web Title : Pune revives stoves amid fuel crisis, searches for spare parts.

Web Summary : Pune residents are dusting off old kerosene stoves due to rising gas prices and potential fuel shortages. Increased booking times for LPG cylinders and rationed kerosene availability have prompted the revival of these vintage appliances. Parts are now in demand.