पुणे,खडकी कॅन्टोन्मेंटच्या महापालिकेत समावेशाला राज्य सरकारची तत्वत: मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 16:35 IST2025-07-10T16:34:38+5:302025-07-10T16:35:13+5:30
पुणे : पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंटबोर्डाचा पुणेमहापालिकेत समावेश करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे. संरक्षण ...

पुणे,खडकी कॅन्टोन्मेंटच्या महापालिकेत समावेशाला राज्य सरकारची तत्वत: मान्यता
पुणे : पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंटबोर्डाचा पुणेमहापालिकेत समावेश करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे. संरक्षण विभागाच्या प्रस्तावानुसार पुढील तीन महिन्यात विलीनीकरणाची प्रक्रीया पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंटबोर्डाचा पुणेमहापालिकेत समावेश करण्याबाबतच्या बैठकीला नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार सिध्दार्थ शिरोळे,महापालिका आयुक्त नवल किशोर राम. यांच्यासह दोन्ही बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी या उपस्थित होते.
संरक्षण विभागाचे अधिकारी दिल्लीवरून ऑनलाईन बैठकीत सहभागी झाले होते. या दोन्ही बोर्डांच्या विलिनीकरणासाठी आमदार सुनिल कांबळे यांनी सातत्याने राज्यशासनाकडे पाठपुरावा केला होता. महापालिका हद्दीच्या लगत असूनही या भागातील अनेक नागरिकांना मुलभूत सुविधांसाठी अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याने हे विलीनीकरण व्हावे अशी मागणी अनेकदा शासनाकडे केली असल्याचे कांबळे यांनी सांगितले.