पुन्हा एकदा हादरलं पुणे ! वाळू सप्लाय करणाऱ्यावर गोळीबार; वानवडी परिसरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 14:19 IST2020-10-12T14:18:58+5:302020-10-12T14:19:53+5:30
गोळीबाराचा आवाज ऐकून लोक धावत आले. तोपर्यंत हल्लेखोर पळून गेला...

पुन्हा एकदा हादरलं पुणे ! वाळू सप्लाय करणाऱ्यावर गोळीबार; वानवडी परिसरातील घटना
पुणे : बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करुन खुन केल्याची घटना ताजी असताना सोमवारी वानवडी परिसरात वाळू सप्लायर करणाऱ्यावर गोळीबार करण्याची घटना घडली.
मयुर विजय हांडे (वय २९, रा़ हांडेवाडी रोड) असे गोळीबार झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना वानवडीतील इनामदार ग्राऊंडच्या शेजारील मोकळ्या जागेत सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. हांडे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
मयुर हांडे यांचा वाळू पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. सोमवारी दुपारी ते वाळू टाकण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन इनामदार ग्राऊंडच्या शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानात आले होते. यावेळी एका जणांने त्यांच्यावर गोळीबार केला. गोळी त्यांच्या गालाला चाटून गेली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गोळीबाराचा आवाज ऐकून लोक धावत आले. तोपर्यंत हल्लेखोर पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.