'एक ते चार' बंद ?? छे आता 24 तास सुरु.. शौकिन पानापासून ते चितळे मिठाईपर्यंत पुण्यातली दुकाने आता 24 तास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 21:56 IST2021-03-15T21:47:45+5:302021-03-15T21:56:24+5:30
तंत्रज्ञानाने`बदलतेय`पुण्याची`ओळख. दुकानात`आता टच फ्री व्हेंडिंग मशीन

'एक ते चार' बंद ?? छे आता 24 तास सुरु.. शौकिन पानापासून ते चितळे मिठाईपर्यंत पुण्यातली दुकाने आता 24 तास
एक ते ४ बंद म्हणजे बंद!- अहो ही पुणेकरांची वामकुक्षीची वेळ असते हे तर तुम्ही अनेकदा ऐकलं असेलच .. पण या विश्रांतीमुळे बऱ्याचदा पुणेकरांना टोमणे ही ऐकवले जातात. पण त्याचा काही फरक पडेल ते पुणेकर कसले !आता वर्षानुवर्षे जपलेली विश्रांतीची संस्कृती मोडतील ते पुणेकर कसले? अहो पुणे म्हणजे अभिमान..
पण काळानुरूप काही बदल करावे लागतात हे कळण्याइतपत पुणेकरांना कळतं हं ..असाच एक बदल हळूहळू पुण्यात घडून येतोय. याला कारणीभूत ठरलाय तो कोरोना. 1 ते 4 बंद असणारी पुण्यातली दुकानं आता चक्क 24 तास सुरु राहणार आहेत.अर्थात यासाठी पुणेकर काम करणार नाहीयेत बरंका. त्यांनी अर्थातच मदत`घेतली आहे`ती तंत्रज्ञानाची.
पुण्यातल्या नेहमी ऑन डिमांड राहणाऱ्या दुकानांबाहेरआता डीसपेंसर्स बसवण्यात आले`आहेत. यामध्ये`तुम्हाला`चितळेंचा`मिठाई`पासून`ते अगदी`शौकीन`चा पानापर्यंत सगळ्या गोष्टी 24 तास मिळणार आहेत. हे डिस्पेन्सर कॉईन बॉक्स सारखे काम करतात किंवा ॲपच्या सहाय्यानंही हाताळले जाऊ शकतात.
या बदल्याबद्दल`बोलतांना शौकीन पान चे `मालक शरद`मोरे`म्हणाले , " आम्ही छोट्या टपरीपासून सुरुवात केली. तिथपासून टपरीचं दुकान केलं. आता त्यात तंत्रज्ञानाची मदत देखील घायचा निर्णय`झाला`आणि आम्ही`दुकानाबाहेर डिस्पेन्सर मशीन बसवायचं ठरवलं"
या बदलला कारणीभूत ठरले ते कोरोना`काळातले`लॉकडाऊन. या विषयी बोलताना चितळे चे इंद्रनील चितळे म्हणाले ," कोरोना चा काळात कोणाशी संपर्क न येता लोकांना सुविधा कशी पुरवता येईल याचा आम्ही प्रयत्न करत होतो. त्यात आम्ही लोकांचा प्रतिसाद मिळतो का बघायला व्हेंडिंग मशीन बसवली .त्यात ही आम्ही यूपीआय पेमेंट चा पर्याय ठेवला आहे. त्यामुळे`कोणताही`संपर्क ना येता खरेदी`कारण शक्य झालं आहे.
टिपिकल १ ते ४ बंदची पुण्याची प्रतिमा आता टेक्नॉलॉमुळे पुसली जातेय. नवीन आणि सोयीच्या गोष्टींना पुणेकर स्मार्टली हाताळताहेत, हेच यावरून दिसून येतं. शेवटी काय पुणे तिथे काय उणे !