शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

मद्यधुंद निवृत्त पोलीस निरीक्षकानं ५ जणांना उडवलं; एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2020 10:30 PM

बालेवाडी येथील घटना; पंक्चरच्या दुकानात मोटार घुसली

पुणे : मद्यधुंद अवस्थेत एका सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाने भरधाव मोटार चालवून दुचाकीस्वाराला धडक देऊन पंक्चरच्या दुकानात घुसून ५ जणांना उडवले. त्यात एकाचा मृत्यू झाला. ही घटना बालेवाडी येथील ममता चौकाजवळ रविवारी दुपारी साडेबारा वाजता घडली.संतोष बन्सी राठोड (वय ३५, रा. काळेवाडी) या अपघातात मृत्यु पावलेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे़ राजेश सर्वेष सिंग (वय ३७, रा़ ताथवडे), यशवंत भाऊसाहेब भांडवलकर (वय २९, रा़ रामनगर, माणिकबाग), दशरथ बबन माने (वय २७, रा. बालेवाडी गाव) व अन्य दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत. चतु:श्रृंगी पोलिसांनी निवृत्त पोलीस निरीक्षक संजय वामनराव निकम (वय ५९, रा. बालेवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची माहिती अशी, संजय निकम हे पुणे शहर पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले आहेत. ते रविवारी दुपारी मंद्यधुंद अवस्थेत पांढऱ्या रंगाच्या मोटारीतून वेगाने बालेवाडी येथील हायस्ट्रीट येथून जात होते. मद्यपानामुळे त्यांचे मोटारीवरील नियंत्रण सुटले व त्यांनी संतोष राठोड यांच्या दुचाकीला धडक दिली. मात्र दुचाकी मोटारीमध्ये अडकल्याने ते जवळपास १०० मीटर फरफटत गेले. त्यानंतरही मोटारीचा वेग कमी झाला नाही. निकम यांच्या मोटारीने ममता चौकाच्या कडेला एका पंक्चरच्या दुकानाला धडक दिली. तेथे पंक्चर काढणारे व अन्य दोघे अशा तिघांना त्यांनी उडवले. त्यानंतर तेथे थांबलेल्या टेम्पोला धडक दिली. ही घटना पहाताच नागरिक गोळा झाले. मद्यधुंद अवस्थेतील निकम यांना पाहून नागरिकांचा संताप अनावर झाला. लोकांनी त्यांना चांगलाच चोप दिला. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक समीर चव्हाण, उपनिरीक्षक मोहन जाधव, दत्ता शिंदे आणि पोलीस नाईक बानगुडे हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी नागरिकांच्या तावडीतून निकम यांची सुटका करुन त्यांना ताब्यात घेतले.