पुणेकरांना पावसाने अक्षरशः झोडपले, बाप्पाच्या निरोपालाही वरूणराजाची हजेरी
By श्रीकिशन काळे | Updated: September 26, 2023 20:35 IST2023-09-26T20:35:04+5:302023-09-26T20:35:26+5:30
आता गुरूवारी गणरायाचे विसर्जन होणार आहे. त्यामुळे वरूणराजाच्या साक्षीने गणरायाला निरोप देता येणार आहे. कारण येत्या दोन तीन दिवसांमध्ये पुणे शहरात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

पुणेकरांना पावसाने अक्षरशः झोडपले, बाप्पाच्या निरोपालाही वरूणराजाची हजेरी
पुणे : रात्री साडे सात वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली. पुणेकरांना अक्षरशः पावसाने झोडपले. पावसाने परतीचा प्रवास सुरू केला असून, पुणे शहरात आज दुपारपर्यंत आकाश निरभ्र होते. त्यानंतर मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. आता गुरूवारी गणरायाचे विसर्जन होणार आहे. त्यामुळे वरूणराजाच्या साक्षीने गणरायाला निरोप देता येणार आहे. कारण येत्या दोन तीन दिवसांमध्ये पुणे शहरात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
यंदा मॉन्सून उशीरा आला आणि आता परतीचा प्रवास देखील उशीराच सुरू झाला आहे. राजस्थानमधून पाऊस परतीला लागला आहे. महाराष्ट्रातील तारीख १० ऑक्टोबर देण्यात आलेली आहे. परंतु, त्यापूर्वीच महाराष्ट्रातून तो परत जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या महाराष्ट्राभर मॉन्सून सक्रिय आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. येत्या दोन तीन दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.