स्वच्छ सर्वेक्षणात पुण्याचा देशात आठवा क्रमांक तर राज्यात दुसरा क्रमांक कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 13:11 IST2025-07-17T13:11:25+5:302025-07-17T13:11:41+5:30
राज्यात पुण्याचा दुसरा क्रमांक कायम आहे. गेल्यावर्षी या सर्वक्षणात पुण्याचा नववा क्रमांक आला होता. यंदाच्या वर्षी पुणे महापालिकेेचे मानाकंन वाढले आहे.

स्वच्छ सर्वेक्षणात पुण्याचा देशात आठवा क्रमांक तर राज्यात दुसरा क्रमांक कायम
पुणे :पुणे महापालिकेला २०२४च्या स्वच्छ सर्वक्षणात देशात आठवा क्रमांक मिळवला आहे. राज्यात पुण्याचा दुसरा क्रमांक कायम आहे. गेल्यावर्षी या सर्वक्षणात पुण्याचा नववा क्रमांक आला होता. यंदाच्या वर्षी पुणे महापालिकेेचे मानाकंन वाढले आहे.
केंद्र सरकारतर्फे देश पातळीवर दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा आयोजित केली जाते. त्यामध्ये सार्वजनिक स्वच्छता, स्वच्छतागृहांची स्थिती, घरोघरी संकलित होणारा कचरा व वस्ती पातळीवर कचऱ्याचे नियोजन, कचऱ्यावरील प्रक्रिया याची प्रत्यक्ष केली जाणारी पाहणी, नागरिकांचा सहभाग, केंद्र शासनाकडून फोनद्वारे नागरिकांकडून घेतला जाणारा अभिप्राय यासह अनेक निकषांचा विचार या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात केला जातो. पुणे महापालिकेचा २०२४ च्या स्वच्छ सर्वेक्षणात देशात आठवा क्रमांक आला आहे. राज्यात पुणे शहर हे स्वच्छतेमध्ये दोन क्रमांकावर आलेले आहे.
कोरोनानंतर झालेल्या स्पर्धेत २०२० ला पुण्याचा १५ वे नामांकन मिळाले होते. त्यानंतर २०२१ मध्ये थेट पाचव्या क्रमांकवर झेप घेतली होती. त्यामुळे २०२२ आणि २०२३ मध्ये देशात नववा क्रमांक आला होता. २०२४ मध्ये पुणे महापालिकेचे स्वच्छ सर्वक्षणात देशात आठवा क्रमांक आला आहे. त्यामुळे स्वच्छत सर्वक्षणात पुणे महापालिकेचे कमबॅक झाले आहे.
महापालिका कर्मचाऱ्यांचे प्रयत्न, त्याला नागरिकांची साथ मिळत आहे. आगामी काळात शहर स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी विविध संस्थांचा सहभाग देखील वाढवण्यात येणार आहे. - संदीप कदम, उपायुक्त घनकचरा विभाग, पुणे महापालिका