पुणे : खडकवासला धरण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे मुठा नदीत १७ हजार ४२९ क्युसेकने पाणी सोडले आहे. पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पूरबाधितांनी घरी जाण्यास सुरुवात केली आहे.
खडकवासला धरणातून बुधवारी सकाळी १० वाजता ३९ हजार १३८ क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नदीला पूर आल्यामुळे सिंहगड रस्त्यावरील एकता नगरी, निंबजनगर या सोसायटीमध्ये पाणी शिरले आहे.
महापालिका प्रशासनाने ताडीवाला रोड, शांतीनगर झोपडपट्टी, चिमा गार्डन, फुलेनगर, साईनाथ नगर वडगाव शेरी, पाटील इस्टेट झोपडपट्टी, रजपूत झोपडपट्टी, तपोधाम, आदर्शनगर बोपोडी येथे पाणी शिरले होते. त्यामुळे पुणे महापालिकेने शाळा ४०४ कुटुंबातील तब्बल १ हजार ४९८ नागरिकांचे स्थलांतर केले होते. पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून ३९ हजारावरून गुरुवारी सायंकाळी १७ हजार ४२९ क्युसेकपर्यंत पाणी कमी केले आहे. त्यामुळे पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पूरबाधितांनी घर जाण्यास सुरुवात केली आहे.