शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यातील २१ मंडळांत अतिवृष्टी, ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 09:25 IST

- केवळ मे महिन्याचा विचार केल्यास जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ९९० टक्के  अर्थात २२२.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पुणे : जिल्ह्यात रविवारी पावसाने बारामती, इंदापूर, दौंड या तीन तालुक्यांत अक्षरशः धुमाकूळ घातला. या तीन तालुक्यांमधील एकूण ८ तर जिल्ह्यातील एकूण २१ मंडळांमध्ये ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात रविवारी सरासरी ५३.३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात लोणावळा येथे सर्वाधिक २३६ मिलिमीटर पाऊस पडला आहे. केवळ मे महिन्याचा विचार केल्यास जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ९९० टक्के  अर्थात २२२.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या पूर्व भागाला पावसाने झोडपून काढले आहे. त्यातच रविवारी बारामती, दौंड, इंदापूर तसेच मावळ तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. बारामती तालुक्यातील बारामती मंडळात १९४.८, माळेगाव मंडळात १०८.३ तर पणदरे ७०.३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. या तालुक्यात रविवारी सरासरी ७७ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. 

दौंडमध्ये देखील पावसाचा जोर मोठा होता. तालुक्यातील देऊळगाव मंडळात ७३.५, राहू मंडळात ६५.८ तर पारगाव मंडळात ११४.३ मि.मी. पावसाची नोंद झाली. दौंडमध्ये रविवारी सरासरी ६४ मि.मी. पाऊस झाला आहे. इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे १३६.३, तर सणसर मंडळात १९४.८ मि.मी. पाऊस झाला आहे. हा आजवरचा मोठा पाऊस असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. इंदापूर तालुक्यात रविवारी ५६.१ मि.मी. पाऊस झाला आहे. पुरंदर तालुक्यातही कुंभारवळण मंडळात ६५ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. या तालुक्यात रविवारी सरासरी ४३.६ मि.मी. पाऊस झाला. मावळ तालुक्यातही पावसाचा जोर असून, ५ मंडळांमध्ये ६५ मि.मी. पेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. 

पंधरा घरांमध्ये शिरले ओढ्याचे पाणीइंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथे पंधरा घरांमध्ये ओढ्याचे पाणी शिरले होते. तसेच निरगुडे येथे चाळीस, लाकडी येथे २, चिखली येथे १४ व तावशी येथे एकेका घरामध्ये पाणी शिरल्याची घटना घडली. बारामती तालुक्यात जळोची येथे रुपेश सिंह नावाची व्यक्ती पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली. त्याला बारामती नगरपालिका प्रशासन, एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने बाहेर काढले. काटेवाडी येथे घरात अडकून पडलेला सात जणांना प्रशासनाने बाहेर काढले.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसWaterपाणीMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड