शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Pune Rain: पुण्यात सकाळपासून संततधार पाऊस; सणासुदीच्या दिवसात नागरिकांची उडाली धांदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 13:17 IST

ऑगस्टच्या सुरुवातीला पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र १५ ऑगस्टनंतर तो पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे

पुणे : पुण्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. नेमका शनिवार रविवार बघून संततधार सुरु झाल्याने नागरिकांची धांदल उडाल्याचे दिसून आले आहे. पुढील दोन तीन दिवस पुण्यात पाऊस होणार असल्याचे हवामान विभाकडून सांगण्यात आले आहे. 

सकाळी भारतीय हवामान विभागाने पुढील ३-४ तासांत अहमदनगर नांदेड पुणे  व  रायगड या जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार पावसाला सुरुवात झाली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून, पुणे शहरातही पाऊस धुमाकूळ घालत आहे. राज्यामध्ये अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. 

पुणे शहर व जिल्ह्यामध्ये ढगांची निर्मिती होत असून, परिणामी जोरदार पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, राज्याच्या अनेक भागात पाऊस पडत आहे. परंतु, पावसाचे प्रमाण असमान आहे. शहरात गेल्या चार-पाच दिवसांपासून दररोज सायंकाळी मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी लागत आहे. पण आज मात्र दुपारीच तीन वाजता सरी कोसळल्या. श्रावण महिना सुरू असल्याने उन्ह-पावसाचा खेळ पुणेकरांना पहायला मिळत आहे. जून महिन्यापासून आतापर्यंत पुणे शहरात चांगला पाऊस झाला आहे. जुलै महिन्यातील पावसामुळे सर्व धरणंही भरून गेली. मात्र ऑगस्ट महिना सुरू झाला आणि पावसाने काहीशी विश्रांती घेतली. पण पंधरा ऑगस्टनंतर मॉन्सून सक्रिय झाला आणि पुण्यात सायंकाळी जोरदार पाऊस होत आहे. 

खडकवासला धरणातून विसर्ग सुरु

खडकवासला धरणातून दुपारी १ वा. मुठा नदी पात्रात ६ हजार ४४६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. तो वाढवून  दुपारी २ वा. मुठा नदी पात्रात ८ हजार ७३४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दुपारी ३ वा. मुठा नदी पात्रातून १२ हजार ९५८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये; खबरदारी घ्यावी असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसenvironmentपर्यावरणNatureनिसर्गSocialसामाजिकMaharashtraमहाराष्ट्र