Pune Rain : पुणे शहरात सलग दुसऱ्या दिवशी दमदार पावसाची हजेरी, कात्रजला झाडपडीच्या घटनेमध्ये २२ वाहनांचे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 08:19 PM2021-06-18T20:19:31+5:302021-06-18T20:20:57+5:30

शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे पडण्याच्या घटना घडल्या.

Pune Rain: Heavy rain in Pune city on friday , 22 vehicles damaged due to fall down big tree in katraj | Pune Rain : पुणे शहरात सलग दुसऱ्या दिवशी दमदार पावसाची हजेरी, कात्रजला झाडपडीच्या घटनेमध्ये २२ वाहनांचे नुकसान 

Pune Rain : पुणे शहरात सलग दुसऱ्या दिवशी दमदार पावसाची हजेरी, कात्रजला झाडपडीच्या घटनेमध्ये २२ वाहनांचे नुकसान 

googlenewsNext

पुणे : पुणे शहरात गुरुवारी सुरू झालेला पावसाचा सिलसिला शुक्रवारीही कायम राहिला. दिवसभर मुसळधार पावसाचा जोर कायम होता. याचवेळी आज दुपारी कात्रज परिसरातील चौघुले इंडस्ट्रीजजवळ मोठे झाड कोसळून झालेल्या घटनेत २२ वाहनांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढल्या आहेत. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसून कुणी जखमी देखील झालेले नाही.  

पुणे शहरात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा गुरुवारी (दि. १७) वरुणराजाने जोरदार हजेरी लावली आहे. तसेच शुक्रवारी देखील उपनगरात सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू होती. दिवसभरात अनेकदा पुणेकरांना ऊन-पावसाचा खेळ सुरू होता.

चार वाजण्याच्या सुमारास कात्रज येथील चौगुले इंडस्ट्रीज परिसरातील बाभळीचे मोठे झाड कोसळले. यामध्ये झाडाखाली पार्क करण्यात आलेल्या तब्बल बावीस दुचाकी वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. कात्रज अग्निशामक दलाचे जवान तत्परतेने घटनास्थळी दाखल झाले. दलाचेे प्रभारी प्रमुख सुभाष जाधव, तांडेल रामदास शिंदे, पंकज इंग वले, प्रसाद कदम, देवदूतचे जवान निलेश तागुंदे, श्रीकांत वाघमोडे, अविनाश लांडे यांनी झाडाच्या फांद्या कापून दुचाकी बाजूला घेतल्या. 

पुणे शहरात अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने काल बरसायला सुरुवात केली. मध्यम स्वरूपाच्या पावसाने पुणेकरांची तारांबळ उडालीच होती. पण त्यातून रस्ते घसरडे झाल्याने छोटे अपघातही झाले. अशाच परिस्थितीत शहरातील मध्यवर्ती भागाबरोबरच उपनगरात झाड पडण्याच्या नऊ घटना घडल्या आहेत.

मध्यवर्ती भागाबरोबरच उपनगरात पडली झाडे 
गणेश खिंड रस्ता, पर्वती, लक्ष्मीनगर रमणा गणपती जवळ, सहकारनगर शिंदे हायस्कुल समोर, प्रभात रस्ता गल्ली क्रमांक ३, सेनापती बापट रस्ता सेल पेट्रोल पंपाजवळ, कोथरूड आयडियल कॉलनी, सदाशिव पेठ लज्जत हॉटेलजवळ, खडकी रस्ता रॉयल सोसायटी समोर, कोथरूड उजवी भुसारी कॉलनी या भागात झाडपडी आणि फांदी पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

Web Title: Pune Rain: Heavy rain in Pune city on friday , 22 vehicles damaged due to fall down big tree in katraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.