Pune To Nagpur Trains Cancelled: पुणे रेल्वे विभागातील दौंड - मनमाड लोहमार्गावरील दौंड ते काष्टी स्थानकांदरम्यान दुहेरीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे प्री-नॉन इंटरलॉकिंग (प्री-एनआय) आणि नॉन-इंटरलॉकिंग (एनआय) कामासाठी रेल्वेकडून विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे दि. १५ ते २५ जानेवारीदरम्यान काही महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्या वळविण्यात येणार आहेत. यामुळे प्रवाशांनी गाड्यांची वेळापत्रक बघूनच बाहेर पडावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या (सोलापूरकडे दि. १४ ते २५)
- गाडी क्रमांक १२१६९ पुणे-सोलापूर एक्स्प्रेस
- गाडी क्रमांक १२१७० सोलापूर-पुणे एक्स्प्रेस
- गाडी क्रमांक १२१५७ पुणे-सोलापूर एक्स्प्रेस
- गाडी क्रमांक १२१५८ सोलापूर-पुणे एक्स्प्रेस
- गाडी क्रमांक ११४१७ पुणे-सोलापूर डीईएमयू
- गाडी क्रमांक ११४१८ सोलापूर-पुणे डीईएमयू
- गाडी क्रमांक ७१४०१ पुणे-दौंड डीईएमयू
- गाडी क्रमांक ७१४०२ दौंड-पुणे डीईएमयू
दि. २३ ते २६ दरम्यान रद्द गाड्या :
- गाडी क्रमांक ११०२५ पुणे-अमरावती एक्स्प्रेस
- गाडी क्रमांक ११०२६ अमरावती-पुणे एक्स्प्रेस
- गाडी क्रमांक १२११९ अमरावती-पुणे एक्स्प्रेस
- गाडी क्रमांक १२१२० अजनी-पुणे एक्स्प्रेस
- गाडी क्रमांक ११४१० निजामाबाद-पुणे एक्स्प्रेस
- गाडी क्रमांक १२११३ पुणे-नागपूर गरीब रथ एक्स्प्रेस
- गाडी क्रमांक १२११४ नागपूर-पुणे गरीब रथ एक्स्प्रेस
- गाडी क्रमांक १७६२९ पुणे-नांदेड एक्स्प्रेस
- गाडी क्रमांक १७६३० नांदेड-पुणे एक्स्प्रेस
वळविण्यात आलेल्या महत्वाच्या गाड्या :
- गाडी क्रमांक २२६८५ यशवंतपूर-चंदीगड एक्स्प्रेस मनमाड - इगतपुरी - कसारा - कल्याण - पनवेल - कर्जत - लोणावळा - पुणे मार्गे धावणार.
- गाडी क्रमांक ११०२८ सातारा-दादर एक्स्प्रेस सातारा-जेजुरी-पुणे मार्गे वळवली.
- गाडी क्रमांक १६३३२ तिरुवनंतपुरम - सीएसएमटी एक्स्प्रेस कुर्डुवाडी - मिरज - पुणे मार्गे वळवली.
- गाडी क्रमांक ११०७८ जम्मूतावी-पुणे एक्स्प्रेस मनमाड-इगतपुरी-कसारा - कल्याण - पनवेल - कर्जत - लोणावळा - पुणे मार्गे वळवली.
- गाडी क्रमांक १२७८० हजरत निजामुद्दीन - वास्को-द-गामा मनमाड - इगतपुरी - कसारा - कल्याण - पनवेल - कर्जत - लोणावळा - पुणे मार्गे वळवली.
- गाडी क्रमांक १५०३० पुणे-गोरखपूर एक्स्प्रेस लोणावळा - कर्जत - पनवेल - कल्याण - इगतपुरी - मनमाड मार्गे वळवली.
गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन/शॉर्ट ओरिजिनेशन :
- गाडी क्रमांक २२९४४ इंदूर-दौंड एक्स्प्रेसचा प्रवास खडकी येथेच समाप्त होईल.
- गाडी क्रमांक २२१९४ ग्वाल्हेर-दौंड एक्स्प्रेसचा प्रवास खडकी येथेच समाप्त होईल.
- गाडी क्रमांक २२९४३ दौंड-इंदूर एक्स्प्रेस दि. २४ आणि २५ रोजी पुणे येथून १५:३३ वाजता सुरू होईल.
- गाडी क्रमांक २२१९३ दौंड-ग्वाल्हेर एक्स्प्रेस दि. २५ रोजी खडकी येथून ००:२५ वाजता सुरू होईल.
Web Summary : Due to doubling work on the Daund-Manmad railway line, several Pune-bound trains are cancelled from January 15-26. Some trains are diverted via alternate routes. Passengers are advised to check the revised schedule.
Web Summary : दौंड-मनमाड रेल मार्ग पर दोहरीकरण कार्य के कारण, पुणे जाने वाली कई ट्रेनें 15-26 जनवरी तक रद्द रहेंगी। कुछ ट्रेनों को वैकल्पिक मार्गों से चलाया जाएगा। यात्रियों को संशोधित समय सारिणी जांचने की सलाह दी जाती है।