तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना पकडले; मोबाइलमध्ये ६० हजार रुपयांची तत्काळ तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 13:21 IST2026-02-21T13:20:36+5:302026-02-21T13:21:13+5:30

- या ठिकाणी तत्काळ तिकिटाचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती दक्षता पथकाला मिळाली होती.

Pune Railway Passenger Two arrested for black marketing tickets; Tatkal tickets worth Rs 60,000 in mobile | तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना पकडले; मोबाइलमध्ये ६० हजार रुपयांची तत्काळ तिकीट

तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना पकडले; मोबाइलमध्ये ६० हजार रुपयांची तत्काळ तिकीट

पुणे : मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने पुणे विभागातील वाठार रेल्वे स्थानकावर तत्काळ तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दोन व्यक्तींना गुरुवारी रंगेहात पकडण्यात आले. या आरोपींच्या मोबाइलमध्ये ६० हजार रुपयांची तत्काळ सक्रिय रेल्वेची आरक्षित तिकिटे आढळून आली आहेत, तसेच अनेक दिवसांपासून तिकिटाचा काळाबाजार करत असल्याचे आढळून आले आहे.

पुणे रेल्वे विभागातील सातारा जिल्ह्यात वाठार रेल्वे स्थानक आहे. या ठिकाणी तत्काळ तिकिटाचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती दक्षता पथकाला मिळाली होती. त्यानुसार, पथकाने गुरुवारी सापळा रचून दोघांना तत्काळ तिकीट काढत असताना पकडले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर ते बऱ्याच दिवसांपासून अवैध मार्गाने तत्काळ तिकिटे काढून चढ्या दराने विक्री करत असल्याचे दिसून आले.

दक्षता पथकाच्या अधिकाऱ्यांनी आरोपींच्या मोबाईलचा तपास केला असताना त्यांच्याकडे ६० हजार रुपये किमतीची सक्रिय असलेली आरक्षित तत्काळ तिकिटे असल्याचे दिसून आले आहे. तसेच, काही दिवसांमध्ये त्यांनी एक लाख रुपयांची तिकीट विक्री केल्याचे दिसून आले आहे. हे आरोपी केवळ आजच्या कारवाईतच नव्हे, तर बऱ्याच काळापासून रेल्वे तिकिटांच्या काळाबाजारीच्या या अवैध धंद्यात सक्रियपणे सामील होते.

त्यांनी अनेक प्रवाशांना तत्काळ तिकिटे उपलब्ध करून देण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आरोपींना रेल्वे सुरक्षा दलाच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांना यामध्ये आणखी कोणाचा सहभाग होता का, रेल्वे प्रशासनातील कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.

Web Title : टिकटों की कालाबाजारी करते दो गिरफ्तार; ₹60,000 के टिकट जब्त।

Web Summary : वाठार रेलवे स्टेशन पर तत्काल टिकटों की कालाबाजारी करते दो लोग गिरफ्तार। उनके फोन से ₹60,000 के सक्रिय टिकट जब्त। उन पर यात्रियों को धोखा देने का संदेह है।

Web Title : Two arrested for black marketing train tickets; ₹60,000 worth seized.

Web Summary : Two individuals were arrested at Wathar railway station for black marketing Tatkal tickets. Authorities seized ₹60,000 worth of active tickets from their phones. They are suspected of defrauding passengers for profit.